HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडे यांची ‘गंगाखेड शुगर्स’संदर्भातील ‘लक्षवेधी’ राखून ठेवण्याची सरकारवर नामुष्की

मुंबई, :- परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील ‘गंगाखेड शूगर’ कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे व संचालक मंडळाने तीस हजार शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या व बोगस कागदपत्रे तयार करुन काहीशे कोटींचं कर्ज परस्पर काढून केलेल्या फसवणुकप्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्री समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने ती खून ठेवण्याची नामुष्की आज सरकारवर आली.

‘गंगाखेड शूगर’चे संचालक रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज घेऊन केलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा मुंडे यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता.

यावेळी गुट्टे यांनी अडीच एकराच्या सात-बाऱ्यावर ५०२ कोटी रुपयांचं कर्ज उचलल्याची गंभीर बाब सभागृहाच्या लक्षात आणून दिली. मागील दहा महिन्यांपासून आपण स्वत: या भ्रष्टाचार प्रकरणाचा पाठपुरावा करत असून सरकारकडून आपल्या पत्रांची कोणतीही दखल घेण्यात आली उलट गुट्टे यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला, परंतु 22 दिवस उलटूनही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. यासंदर्भात गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी दिलेले निवेदन सत्य दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मुंडे यांनी केला.

यावरील चर्चेत ज्येष्ठ सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, किरण पावसकर, भाई जगताप, जयवंत जाधव आदी सदस्यांनी भाग घेतला. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने ही लक्षवेधी राखून ठेवण्याचे निर्देश उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही पवारांचे सर्व बालेकिल्ले उध्वस्त करत त्यांना पिंगा घालायला लावला !

News Desk

रेल्वे सेवा सुरु करा, अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल- मनसेचा इशारा

News Desk

शिवसेनेच्या संपर्क अभियानाला गालबोट,बॅनरवर फोटो नसल्याच्या नाराजीतुन तालुकाप्रमुखाला गंभीर मारहाण

News Desk