HW News Marathi
महाराष्ट्र

धर्माबादच्या प्रवाशांनी मांडल्या डीआरएम जैन यांच्याकडे रेल्वेच्या समस्या

महेश जोशी

धर्माबाद – हैदराबाद रेल्वे डिव्हिजनचे रेल्वे प्रबंधक आरूण कुमार जैन यांनी धर्माबाद रेल्वे स्थानकावर भेट देवून प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सखाराम निलावार यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात प्रमुख मागण्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यात धर्माबाद रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्यात यावा, पोलीस चौकी उभारण्यात यावी, पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी, तात्काल टिकीट मिळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मध्ये काही दलाल तिकिट देण्याऱ्यांना हाताशी धरून गोरख धंदा चालू केला यावर रेल्वे प्रशासनानाचे अंकुश नसल्याने सर्व सामान्य प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी नगराध्यक्षा अफजलताई यांचे प्रतिनिधी म्हणून अब्दुल सत्तार सेट, उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी.गणेशराव पाटील करखेलीकर, मोगला गैड, सखाराम निलावार, रमेश पाटील, नगरसेवक निलेश पाटील, राजु सुरकुटवार, उमेश झंवर, गोविंद सोनटक्के, युनुस खान,आबेदआली, देवेंद्र चिद्रावार, बाबाराव भालेराव, ताहेर पढान, , सतिश शिंदे, रवींद्र शेट्टी,मारोती माकणे, शंकर बोलमवाड, पत्रकार जि पी. मिसाळे, माधव हानमते, महेश जोशी, सुधीर येलमे उपस्थित होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राजकीय हेतूने ईडी, सीबीआयचा वापर”, हसन मुश्रीफांचा भाजपवर गंभीर आरोप

News Desk

फडणवीस सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात कायदा टिकवला – आशिष शेलार

News Desk

अखेर अण्णा हजारे कृषी कायद्यांविरोधात मोदींविरुद्ध आंदोलन करणार

News Desk