HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेड येथे महिला भूषण पुरस्कार प्रदान सोहळा

जिंदा शहिद मनींदरजीतसिंग बिट्टा यांच्या हस्ते

विशेषपोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

उत्तम बाबळे

नांदेड:-दरवर्षी जागतीक महिला दिनी देण्यात येणार्‍या कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार जिंदा शहिद मनींदरजीतसिंग बिट्टा यांच्यासह आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते दि.८ मार्च २०१७ रोजी सायंकाळी ६:०० वाजता कुसूम सभागृह, नांदेड येथे प्रदान करण्यात येणार आहेत.

मीमांसा फाऊडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, समीक्षा, पत्रकार प्रेस परिषद, ह्युमन राईट्स फाऊडेशन व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने दरवर्षी जागतीक महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार देऊन सन्मानीत करणयात येते. यंदाचे हे आठवे वर्ष आहे. सदरील पुरस्कार सोहळा अ‍ॅन्टी टेरिरिस्ट फ्रंट दिल्लीचे संस्थापक, माजी कॅबीनेट मंत्री, युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा दोनदा आतंकवादी हल्ला होऊनही न खचता देशसेवेसाठी सततचा लढा देणार्‍या ” जिंदा शहिद ” म्हणुन सर्वपरिचित असलेले मनींदरजीतसिंग बिट्टा यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्यासह आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.यावेळी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, महापौर सौ.शैलेजा स्वामी, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे संचालक नरेंद्रदादा चव्हाण, पद्मजा सिटीचे संचालक बालाजीराव जाधव, चौगुले कोचिंग क्लासेसचे संचालक दशरथ पाटील व मुंबई सकाळचे संपादक संदीप काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

तरी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे अवाहन मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे रामेश्वर धुमाळ, दिलीप माहोरे, श्रीमती पुनीता रावत, सौ.संगीता बारडकर, पत्रकार प्रेस परिषदेचे प्रदेश प्रभारी अरविंद जाधव, शिवहरी गाढे, श्रीमती उषा हडोळतीकर, सौ.जयालक्ष्मी गादेवार, सौ.रूपाली रघुजीवार, सुचीता मुत्तेपवार, सौ.हेमा बारडकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश पांडे आणि पत्रकार प्रेस परिषदेचे राज्याध्यक्ष तथा संघाचे जिल्हा सरचिटणीस रूपेश पाडमुख यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरावती हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी १४४ कलम लागू

News Desk

संजय राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरादेवीत समर्थकांची तुफान गर्दी

News Desk

अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सरकार दुर्लक्ष करत आहे का?

News Desk