HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेडच्या महापाैर शैलजा स्वामी यांनी ” नो व्हेईकल डे “अॅटोरिक्षातून साजरा केला

उत्तम बाबळे नांदेड :- वाढत्या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी कांही अंशी का होईना प्रयत्न व्हावेत या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी वाहन विरहीत प्रवास दिन ( नो व्हेईकल डे ) साजरा करण्याचा ठराव नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेने नुकताच घेतल्यानुसार महापाैर शैलजा किशोर स्वामी यांनी स्वत:चे किंवा महापालिकेचे वाहन न वापरता चक्क अॅटोरिक्षातून महापालिकेत येण्या जाण्याचा प्रवास करुन नो व्हेईकल डे साजरा केला आहे. वाढती लोकसंख्या व त्यानुसार वाहन संख्येचा वाढता आलेख पाहता नांदेड वाघाळा महानगर पालिका क्षेत्रात वाहतुकीची कोंडी होत असून प्रदुषणाचे प्रमाण वाढत आहे. शहरामध्ये ग्रीन हाऊस झोन वाढविणे, गॅसेसचे प्रमाण कमी करणे, वाहतूक कोंडीचे सोडविणे, इंधन बचत करणे,यावर उपाय योजना करत नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीचा प्रयत्न म्हणून महिन्यातील १ दिवस तरी राजकिय पदाधिकारी,अधिकारी व कर्मचा-यांसह नागरीकांनी स्वत:चे किंवा प्रशासकिय वाहनांचा वापर टाळत प्रवास केला पाहिजे.अशा संकल्पाचा ठराव नुकताच महानगर पालिकेने घेतला होता.या संकल्पानूसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी वाहन विरहीत प्रवास दिन ( नो व्याहेईकल डे )साजरा केला पाहिजे असे ठरले होते. हे ठरल्यानूसार नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या महापाैर शैलजा स्वामी यांनी ४ मे रोजी महानगर पालिकेेचे अथवा स्वत:चे वाहन वापरले नाही. महापालिकेत जाण्यासाठी त्या घरुन पायी निघाल्या व अंतर लांबचे असल्यामुळे मुख्य रस्त्यावरुन त्यांनी एका अॅटोरिक्षातून प्रवास करत महापालिकेचे कार्यालय गाठले.तसेत सायंकाळी देखील परतीचा प्रवासही अॅटोरिक्षातूनच केला.वास्तविक पाहता सर्वांनी सायकलने प्रवास करावे असे ठरले होते.परंतू सायकल चालविता येत नसल्याने त्यांनी अॅटोरिक्षातून प्रवास करत नो व्हेईकल डे साजरा करुन ठरल्या प्रमाणे शब्द पाळला.या बद्दल त्यांचे काैतुक होत असून रखरखत्या उन्हात एसी युक्त चारचाकी वाहनाचा मोह टाळून येत्या गुरुवारी सायकलने कोण कोण प्रवास करतील ? हे पाहणे बाकी असून याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पानसरे हत्येप्रकरणी संशयित आरोपी गायकवाडला सशर्त जामीन

News Desk

फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं, भाजपचा हल्लाबोल

News Desk

खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते खासदार उदयनराजे भोसलेंचं अजब विधान!

News Desk