HW News Marathi
महाराष्ट्र

नवापूर मध्ये शेकडो शिवसैनिक भाजपात सामील

पालघर/ नागनाथ बाबर.

नवापूर – नवापूर गावातील शेकडो शिवसैनिक भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

नवापूर येथे भाजपाचे तरुण नेते अंकुर राऊत यांच्या नेतृत्वाखाली व पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत सेना व बविआ आणि काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.या वेळी सेनेचे आजी माजी युवासेना अध्यक्ष व उपाध्यक्ष सह ग्रामपंचायतचे माजी सरपंचासह सदस्य व बविआ आणि काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत प्रवेश केला . यात महिलांचा हि समावेश होता.

या वेळी मंत्री विष्णू सवरा, आमदार पास्कल धणारे, कृषी सभापती अशोक वडे, बाबाजी काठोळे , वीणा देशमुख जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी ,रंजना संखे, भाजपा बोईसर शहर अध्यक्ष महावीर जैन, जिल्हा कोषाध्यक्ष राजू राठोड, विजय तमोरे,विशेष म्हणजे सुदर्शन अंभीरे माजी ग्रामपंचायत सदस्य, उपशाखा प्रमुख अधिराज किणी,रेवती पाघधरे शिवसेना ग्रामपंचायत सदस्य,दुष्यंत मेहर युवासेना प्रमुख नवापुर,भावेश सावंत जेष्ठ कार्यकर्ता बविआ.यांच्या अथक प्रयत्नाने या कार्यकर्त्यांना भाजपा मध्ये सामील करण्यात यश आले आहे .या वेळी अंकुर राऊत यांचे मंत्री सवरा यांनी कौतुक केले .

या प्रवेशा दरम्यान ग्रामस्थांनी पालक मंत्र्यासमोर गावातील समस्या मांडल्या कित्येक वर्षापासून गावातील प्रश्न प्रलंबित असल्याने व तसेच नवापूर गावाला नेहमीच समूद्राच्या भरतीच्या पाण्याचा तडाखा बसत असून गावकरी त्रस्त झाले आहेत सरकारी यंत्रणा ही वारंवार तक्रार देऊन हि कोणतीच उपाययोजना करीत नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी मांडली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दोन शिवसैनिकांची भेट’, भेटीनंतर अमोल कोल्हे म्हणाले…..

Jui Jadhav

नितेश राणेंनी फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांना करुन दिली ‘एक आठवण’!

News Desk

शिवसेनेचे आमदार बहुदा राष्ट्रवादीमूळे निवडून आले, शरद पवारांच्या उत्तराला दरेकरांचे प्रत्युत्तर

News Desk