HW News Marathi
महाराष्ट्र

पद्माकर केंद्रे यांच्या निलंबन रद्दच्या आदेशाचं कर्मचारी संघटनांकडून स्वागत

उत्तम बाबळे

नांदेड – नांदेड जि.प.चे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांच्या शासकिय सेवा निवृत्तीच्या शेवटच्या दिवशीच विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी कसलीही कारणे दाखवा नोटिस न देता निलंबित केल्याने अधिकारी व कर्मचा-यांतून संताप व्यक्त होत होता. परंतू या अन्यायकारक कारवाईची दाद राज्य शासनाकडे मागितली असता ग्रामविकास व जलसंधारण मंत्रालयाने या सुडबुद्धीने झालेल्या कारवाई ची दखल घेत त्या निलंबनाच्या आदेशाला रद्दबातल केले असून या विभागाचे उपसचिव स.र.बनकर यांनी १७ एप्रिल रोजी तसे आदेशपत्र काढले असल्याने जि.प.नांदेड अंतर्गतच्या विविध अधिकारी व कर्मचारी संघटनांनी शासनाच्या न्यायीक निर्णयाचे स्वागत केले आहे. नांदेड जिल्हा परिषदेचे सेवा निवृत्त अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी तथा नांदेड जिल्ह्याचे भूमीपुत्र पद्माकर केंद्रे यांच्या प्रशासकिय सेवा निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी ३१ मार्च २०१७ रोजी निवृत्ती सत्कार सोहळ्याच्या शेवटच्या घटीकेत अवघ्या ६ तासांपुर्वी डाॅ.पुरुषोत्तम भापकर ,विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी यांना निलंबित केले. तसे आदेश क्र.२०१७/विशा/मविसे-२/प्र.क्र.२३ दि.३० मार्च २०१७ चे पत्र नांदेड येथे येऊन धडकले. अनपेक्षितपणे झालेल्या या अन्यायकारक कारवाईने एका बहुजन समाजातील अधिका-याच्या सेवानिवृती सत्कार सोहळ्यावर विरजन पडले. यामुळे विविध अधिकारी व कर्मचारी संघटनांमध्ये असंतोष पसरला आणि त्या सर्वांनी याचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले.

या कारवाईची दाद पद्माकर केंद्रे यांनी राज्य शासनाकडे मागितली असता ग्रामविकास व जलसंधारण मंत्रालय,विभाग मुंबई यानी दखल घेतली व त्या निलंबन आदेशाला रद्दबातल ठरविले.या विभागाचे उपसचिव सं.र.बनकर यांनी राज्य शासन महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपिल) अधिनियम १९७९ च्या नियम ४ व पोटनिय (५) च्या खंड (क) अन्वये आदेश क्र.४६१७/प्र.क्र.४९/आस्था- २ दि.१७ एप्रिल २०१७ अन्वये तो आदेश रद्दबातल ठरविल्याचे नुतन आदेश पत्र काढले आहे. यामुळे निवृत्त अ.मु.का.अ.पद्माकर केंद्रे यांचे अभिनंदन केले असून जि.कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे नेते सतिश कावडे,ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष लेखा विभाग संघटनेचे एन.डी.कदम,मंत्रालयीन कर्मचारी संघटनेचे डाॅ.सोनकांबळे,लिपीक वर्गीय संघटनेचे अशोक कासराळीकर,जि.प.महासंघाचे आर.जे.मुंडे,गणेश शिंदे, लेखासंवर्ग विभाग संघटनेचे सय्यद मिनाज,पवन तलवारे,व्ही.बी.कांबळे,श्यामकावळे,व्ही.आर.असोरे,जी.एम.गोरे,एस.आर.खरात,इंजि.एस.एम.वाडकर,सुनिल कदम,भगवान एडके,परमेश्वर गोणारे,बालासाहेब लोणे,उत्तमवाढवे,गजाननअगरमोरे,डाॅ.एम.एस.कांबळे,

डाॅ.लच्चू देशमुख,रवि कांबळे,द्न्यानेश्वर वानखेडे,कमल दर्जा,सुमेध हटकर,प्रदिप सोनटक्के,जीवन कांबळे,चेरीयन वर्गीस,दयानंद शिंदे,साै.छाया कांबळे,सुधीर सोणवने,रामकृष्ण पांडे,बळीराम नागरगोजे,कंधारे यासह विविध संघटनांनी शासन निर्णयाचे स्वागत केले आहे.

राज्यशासनाने न्याय दिला – केंद्रे

अख्खी प्रशासकिय सेवा निष्कलंक व निस्वार्थ केलो, शेवटच्या घटीकेत वरीष्ठ अधिका-यांनी सुडबुद्धीने ही कार्यवाही केली.प्रशासकिय अधिका-यांनी भलेही अन्याय केला परंतू राज्य शासनाने न्याय दिल्याने मी त्यांचा आभारी असून भावी आयुष्य जनसेवेत घालीन.अशी प्रतिक्रिया महाबातमीशी बोलताना निवृत्त अ.मु.का.अ.पद्माकर केंद्रे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत पावसाचा कहर चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 14 जणांचा मृत्यू!

News Desk

‘भारतीय स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार’, सेनेची केंद्र सरकारवर टीका!

News Desk

अखेर ठाकरे सरकारचे खातेवाटप जाहीर, शिवसेनेकडे सर्वात जास्त खाती

News Desk