HW News Marathi
महाराष्ट्र

पायलटच्या चूकीमुळचं फडणवीसांचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं

  • तपास पथकानं काढला निष्कर्ष

मुंबई – लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर काही दिवसांपुर्वी कोसळलं होतं. हेलिकॉप्टरच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन असतानाही, पायलटनं ‘टेक ऑफ’चा प्रयत्न केल्यानंच हा अपघात घडल्याचं विमान अपघात तपास पथकाने चौकशी अहवालात नमूद केलंय.

गेल्या २५ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं गेले होते. नियोजित कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे हलगरा इथं तयार केलेल्या हेलिपॅडवरून मुंबईला निघाले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरन् उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच ते हेलिकॉप्टर विजेच्या खांबावर आदळून कोसळलं होतं. या अपघातातून फडणवीस आणि त्यांचा स्टाफ थोडक्यात बचावला होता. घटनेची तात्काळ गंभीर दखल घेऊन, नागरी उड्डाण मंत्रालयाच्या कक्षेतील विमान अपघात तपास पथकाकडे या अपघाताचा तपास सोपण्यात आला होता.

२५ मे रोजी लातूरमधील तापमानाचा पारा चाळिशीपार होता. अशावेळी, हेलिकॉप्टर उड्डाणात अडथळे येतात. त्यामुळे हेलिकॉप्टरला क्षमतेपेक्षा थोडं कमी वजन घेऊनच उड्डाण करणं अपेक्षित असतं. मात्र, पायलटनं वजनाचा अंदाजच घेतला नाही. हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्यानं त्याचं उड्डाणच व्यवस्थित होऊ शकलं नाही आणि हेलिकॉप्टर काही फुटांवरूनच खाली आलं, असं निरीक्षण या पथकानं नोंदवलं आहे. वजनाशिवाय आणखीही छोट्याछोट्या गोष्टींकडेही पायलटचं दुर्लक्ष झाल्याचं या पथकानं म्हटलंय.

हेलिपॅडच्या आसपास विजेचा खांब, तारा नसाव्यात असा नियम आहे. पण, निलंग्यातील मैदानात विजेचा खांब होता, यावरही त्यांनी बोट ठेवलंय. या खांबावरच मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर आदळलं होतं. सुदैवानं, विद्युत पुरवठा लगेचच खंडित झाल्यानं मोठा अनर्थ टळला होता.

विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथले स्थानिक आमदार आणि लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर हे स्वतः उत्तम पायलट आहेत. त्यांचंही या हेलिपॅडच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झालं कसं, अशीही चर्चा अपघातानंतर सुरू झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड ?

News Desk

आजपासून 9 मेपर्यंत औरंगबादमध्ये जमावबंदी लागू, पोलिसांचे आदेश

Aprna

मराठा आरक्षणाचा मोर्चा थेट हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर धडकणार

News Desk