HW News Marathi
महाराष्ट्र

पोलीस पळाले,पण इरफान मुख्यमंत्र्यासाठी धावला ! लिहणा-या पत्रकारावर निलंग्यात गुन्हा दाखल 

हेलीकाॅप्टर कोसळलेल्या घराचे व अापदग्रस्ताचे लवकरच पुनर्वसन करु – निलंगेकर

उत्तम बाबळे / नांदेड :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे हेलीकाॅप्टर निलंगा येथे कोसळले असता अपघातस्थळी मदतीसाठी इरफान शेख धावला व पुलीस मात्र पळाले अशा आशयाची ” पोलीस पळाले,पण इरफान मुख्यमंत्र्यासाठी धावला !” या शिर्षकाखाली बातमी लिहून पोलीसांवरील विश्वास कमी करण्याचा व जनतेत पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला म्हणून एका मोठ्या दैनिकाच्या तालुका प्रतिनिधी(पत्रकार) विरुद्ध निलंगा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर हेलीकाॅप्टर ज्यांच्या घरावर कोसळले आहे त्या कांबळे कुटूंबाचे लवकरच पुनर्वसन करु व आपदग्रस्तांना योग्य ती मदतही शासनाकडुन करु असे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटले आहे.

विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की,राज्याचे मुख्यमंत्री निलंगा दाै-यावर २५ मे रोजी आले असता परत मुंबईकडे जातांना त्यांचे हेलीकाॅप्टर निलंगा येथील मातंग वस्तीत कोसळले.सदरील अपघाताची घटना राज्य व देश पातळीवर मोठा हादरा देणारी होती.सुदैवाने मोठी तथा कसलीही जीवित हाणी झाली नाही.या संकटातून बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री महोदयांनी सर्व यंत्रणा ,राज्य व देशातील जनतेच्या आशिर्वादाचे आभार व्यक्त केले.हेलीपॅड व अपघातस्थळी पोलीस,अग्नीशमन बंब,डाॅक्टर्स व आदी यंत्रणा सज्ज होती.त्यामुळे अपघातस्थळी क्षणाचाही विलंब न करता बंदोबस्तावरील पोलीस मदतीसाठी धाऊन गेले.ही वस्तूस्थिती असतांना व पोलीस तेथे गेलेले प्रत्यक्ष पुरावे असतांना देखील निव्वळ खोडसळपणाने पोलीस पळाले असे म्हणने योग्य नव्हे.असे एका वरीष्ठ पोलीस अधिका-याने म्हटले अाहे.तर अपघातस्थळी बंदोबस्त कर्तव्यावर असलेले पोलीस नायक हनमंत सतिश पडिले (३२),पोलीस ठाणे निलंगा यांनी म्हटले आहे की,हेलीकाॅप्टर जेंव्हा कोसळले त्या वेळी ज्वलनशिल इंधनामुळे हेलीकाॅप्टर पेट घेऊन स्पोट होईल या भितीने तेथील काही नागरीक व यंत्रणेतील लोक पळाले.तसेच घटनास्थळा पासून काही अंतरावर असलेल्या भंगारच्या दुकानवर थांबलेले इरफान शेख ( २८ ) रा.निलंगा हे देखील तेथे आले. परंतू आम्ही व आमचे वरिष्ठ अधिकारी,मंत्री व नेते हे सर्वजणही मदतीसाठी घटनास्थळी धावलो आणि सर्वांना सुखरुप बाहेर काढलोत.याबाबत तसे छायाचित्र,व चलचित्र आदी पुरावे असतांनाही निलंगा येथील एका मोठ्या दैनिकाचे तालुका प्रतिनिधी गोविंद इंगळे (पत्रकार) यांनी निव्वळ खोडसाळपणाने ” पोलीस पळाले,पण इरफान मुख्यमंत्र्यासाठी धावला !” या शिर्षकाखाली बातमी लिहून पोलीस व पोलीस खात्याची बदनामी केली.पोलीस व पोलीस खात्यावरील जनमाणसात असलेला विश्वास कमी करण्याचा प्रयत्न करुन मानहाणी केली.असे म्हटले असून उपरोक्त आशयानुसार २८ मे २०१७ रोजी पो.ना. हनमंत सतिश पडिले यांनी निलंगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.सदरील फिर्यादीवरुन पत्रकार गोविंद इंगळे यांच्या विरुद्ध कलम ५०० भा.द.वि. प्रमाणे २८ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या अपघातात वस्तीतील काही नागरीक जखमी झाले होते व ज्या घरावर हेलीकाॅप्टर कोसळले होते त्या भारत मारोती कांबळे यांच्या कुटूंबियांची निलंगा नगरपालीकेच्या एका निवा-यात तात्पुरती राहण्याची सोय केलेली आहे.हे कुटूंब पार उघड्यावर पडले असल्याची दखल लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी घेतली असून या सर्वांना योग्य ती शासकिय मदत देऊ व कांबळे कुटूंबियांचे लवकरच नूतन घरात पुनर्वसन करणार आहोत अशी माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारमध्ये रंग बदलण्याचं धाडस आहे! – उद्धव ठाकरे

News Desk

कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’

News Desk

अंजली दमनीयांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

News Desk