HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील घराला महिलांचा वेढा

नागपूर : आश्वासने देऊनही मानधनात कोणतीच वाढ न दिल्यामुळे संतापलेल्या हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महिलांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील रामगिरी या शासकीय निवासस्थानापुढे ठिय्या आंदोलन केले. मागासलेल्या आसाम, त्रिपुरा या राज्यांहून कमी मानधन महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना असून ते तातडीने न वाढविल्यास ११ सप्टेंबर २०१७ पासून बेमुदत संपाचा इशारा या वेळी देण्यात आला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)च्या विदर्भाच्या विविध भागातून आलेल्या हजारो अंगणवाडी सेविकांसह कर्मचाऱ्यांनी रामगिरीच्या द्वारावर मोठय़ा संख्येने जोरदार निदर्शने करून शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध केला. या विषयावर ३० मार्च २०१७ ला विधानभवनात महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संघटनेसोबत बैठक घेतली. त्यात मे-२०१७ पर्यंत मानधन वाढीचे आदेश काढण्याचे आश्वासन दिल्या गेले. कारवाई झाली नसल्यामुळे ६ जुलै २०१७ ला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा पंकजा मुंडेंची भेट घेतली असता मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा निर्णयाचे आश्वासन देण्यात आले, परंतु पुढे काहीच झाले नाही. शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांत संताप निर्माण झाला आहे. त्याचाच भाग म्हणून आजच्या आंदोलनाला मोठी गर्दी जमल्याचे आयटकचे सचिव श्याम काळे म्हणाले. मुख्यमंत्री सचिवालयाच्या आशा पठाण यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले. अंगणवाडी सेविकांना लवकरच या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक लावून योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले गेले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महत्वाच्या कामांसाठी परदेशी जाणाऱ्या नागरिकांकरिता प्रिकॉशन डोसच्या कालावधीत घट

News Desk

आता वाहनांचे आरसी बुक पुन्हा ‘स्मार्ट’

News Desk

राज्यात चित्रपटगृह सुरु करण्याच्या विचारात राज्य सरकार, अमित देशमुखांनी दिली माहिती

News Desk