HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रदिनी नांदेडच्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांसह, टाटा,आक्षय कुमार संवाद साधणार

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस साधणार युवा पिढीशी संवाद, तर उद्योगपती रतन टाटा,मेजर जनरल अनुज माथूर व अभिनेता अक्षय कुमार राहणार विशेष उपस्थिती.

उत्तम बाबळे

नांदेड :- यंदाचा ५८ वा महाराष्ट्र दिन ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ दिवस म्हणूनही साजरा करण्यात येणार आहे.या औचित्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक विकासात योगदान देणाऱ्या युवा पिढीशी संवाद साधणार असून या कार्यक्रमामध्ये नांदेड येथील श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रीकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी (एसजीजीएस) मधील शंभर विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. ही बाब नांदेडसाठी आणि आमच्या संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रीया संस्थेचे संचालक डाॅ. एल. एम. वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.

राज्याच्या विकासाबाबत आजच्या युवकांच्या कल्पना जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून साकारलेल्या कार्यक्रमाचा समारोप सोहळा वरळी येथील एनएससीआय येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील जवळपास आठ हजार युवक सहभागी होणार असून आपल्या ट्रान्सफॉर्म महाराष्ट्राबाबतच्या संकल्पना सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला रतन टाटा, मेजर जनरल अनुज माथुर, अक्षय कुमार यांच्यासह विविध मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

देशाची खरी संपदा असलेल्या तरूणाईशी, विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांशी महाराष्ट्र दिनी राज्यापुढील महत्त्वाच्या समस्यांवर चिंतन करत त्यातून समस्यांची उकल करणे आणि त्यावर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी “ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र” हा उपक्रम हाती घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी निधी कामदार यांनी सांगितले.

ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रसाठी डिसेंबर महिन्यात राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्रातील ११ सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील बदल घडविण्यासाठी युवकांनी आपल्या संकल्पना/उपाय सादर करावेत असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार राज्यभरातील जवळपास ११,५०० विद्यार्थ्यांकडून २५०० प्रवेश आले. तर तब्बल ६ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. प्रत्येक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट संकल्पना सादर करणाऱ्या युवकांना सादरीकरण करण्याची संधी १मे च्या कार्यक्रमात मिळणार आहे.

‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’मध्ये ‘एनोव्हेशन एक्झिबिशन’ ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कॅप्टन अमोल यादव यांनी साकारलेले स्वदेशी विमान एनोव्हेशन एक्झिबिशनमध्ये असणार आहे. शिवाय वेगवेगळ्या युवकांनी केलेले इनोव्हेशनही या एक्झिबिशनमध्ये पहायला मिळतील. याबरोबरच पर्यटन, कौशल्य विकास, सांस्कृतिक कार्य, गृह, शिक्षण, माहिती व जनसंपर्क, समृद्धी महामार्ग, एमएमआरडीए-मेट्रो रेल, महाराष्ट्र ट्रान्स हार्बर लिंक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ-स्टार्ट अप योजना, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, कृषी, पाणीपुरवठा आणि स्वच्छता असे विभाग सहभागी होण्याबरोबरच महाराष्ट्र विकासासंबंधित बुथ, स्टॉल्स, प्रदर्शने मांडणार आहेत. आजच्या युवकांनी राज्याच्या विकासाच्या केलेल्या प्रारुपाचाही या प्रदर्शनामध्ये समावेश असणार आहे. ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’मध्ये सहभागी होणारी‘एसजीजीएस-नांदेड’ची टीम H20 – रोहित जंगले, उज्वदीप पाटील, मयूर पाटील, शिवरंजनी कदम, पराग नगराळे, ज्ञानेश्वर काळे या विद्यार्थ्यांच्या दुष्काळावर मात करण्यासाठीच्या संकल्पनेला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्यांना प्रा. मिलिंद वाईकर, प्रा. मिलिंद राजूरकर यांनी मार्गदर्शन केले.

टीम सूर्या- अजिंक्य धारिया, शिवानी सानितीकर, शांतनू बदमोरे, ऐश्वर्या कुलकर्णी, करिष्मा इस्मयील या विद्यार्थ्यांच्या दुष्काळावर मात करण्यासाठीच्या संकल्पनेला चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्यांना प्रा. माणिक रोडगे, प्रा. डी. एस. मेहता व प्रा. विनोद तुन्गीकर यांनी मार्गदर्शन केले.

टीम परिवर्तन- सागर उज्जैनकर वैभव पाटेवार, धनश्री घुगे, सुप्रतिक देशपांडे, सिद्धेश्वर रेवतकर, मयुरी लकशेटे या विद्यार्थ्यांच्या “भविष्याची गरज ओळखून ग्रामीण शिक्षणातील आवश्यक बदल” या संकल्पनेला चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यांना प्रा. अरुण पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शासन आणि बांधकाम व्यावसायिकांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास गृहनिर्माण क्षेत्राला उर्जितावस्था मिळेल!– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

राजगृहाला २४ तास संरक्षण देण्याचा राज्यसरकारचा निर्णय

News Desk

फोन टॅपिंगचे आदेश देणारे रश्मी शुक्लांचे ‘बिग बॉस’ कोण? – अतुल लोंढे

News Desk