HW News Marathi
महाराष्ट्र

राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक सुधारणांना बळ दिले : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

जळगाव राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक विषमता संपावी म्हणून आयुष्यभर प्रयत्न केले. त्यासाठी एकत्रित शाळा सुरू केल्या. त्यांच्यामुळे सामाजिक सुधारणांना बळ मिळाले. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणीसाठी शासनाबरोबर समाजाचाही सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे केले.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस सामाजिक न्याय दिन पंधरवडानिमित्त विभागीय गुण गौरव सोहळा आज दुपारी जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंत्री पाटील हे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वलाताई पाटील, खासदार ए. टी. पाटील, खासदार रक्षाताई खडसे, आमदार स्मिताताई वाघ, आमदार चंदूलाल पटेल, आमदार एकनाथराव खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, आमदार उन्मेश पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपविभागीय अधिकारी जलज शर्मा यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार प्राप्त, विविध योजनांचे लाभार्थी, गुणवंत विद्यार्थी, आंतरजातीय विवाह करणारे दांपत्य, सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ घेत प्रगती साधणाऱ्यांचा लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी मागासवर्गींयाना प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यासाठी स्वत: पुढाकार घेत प्रोत्साहन दिले. त्यामुळे सामाजिक सुधारणांना चालना मिळत गेली. सामाजिक सुधारणांसाठी राजर्षी शाहू महाराज यांनी अथक परिश्रम घेतले. शिक्षण आणि आर्थिक समृध्दीच्या माध्यमातून जातीयता संपेल. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचा एकत्रीतपणे प्रयत्न करुन दलित, मागासवर्गीय समाजांनी प्रगती साधावी. सामाजिक न्याय विभागाने आयोजित केलेला गुणवंतांचा गुणगौरव सोहळ्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असेही पालकमंत्री पाटील यांनी नमूद केले.

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे मंत्री बडोले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समताधिष्ठीत विचारांच्या समाज निर्मितीसाठी सामाजिक न्याय विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. स्पर्धा परीक्षा देणारे तरुण, परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना साहाय्य केले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेल्या स्थळांचा विकास केला जात आहे. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना भरीव अर्थसाहाय्य केले जात आहे. ज्या घरात वडिलांना जातीचा दाखला मिळाला असेल त्याच्या मुलांनाही दाखला मिळावा म्हणून लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री बडोले यांनी नमूद केले.

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री कांबळे म्हणाले, सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे यंदा 125 विद्यार्थ्यांचा विदेशातील उच्च शिक्षणाचा खर्च केला जाईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून जिल्हा, तालुकास्तरावर वसतिगृह सुरू करण्यात येत आहेत. आगामी काळात जळगाव जिल्ह्यात दोन वसतिगृह सुरू करण्यात येतील. महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेत गरजूंनी व्यवसाय करावा. प्रगती साधावी. त्याबरोबरच कर्जफेडही करावी. तसेच मागासवर्गींयांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे आहे, असेही राज्यमंत्री कांबळे यांनी नमूद केले. समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी डॉ. अनिता राठोड यांनी आभार मानले. प्रारंभी समता ग्रुपने स्वागत गीत सादर केले. शाहीर शिवाजीराव पाटील यांनी पोवाडा सादर केला. यावेळी लोकप्रतिनिधी, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राणे, भारती पवार, कपिल पाटील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं प्रॉडक्ट,’ राऊतांचा टोला!

News Desk

खडसेंना त्यांच्या कष्टाची नोंद घेतली नाही असं वाटतं असेल तर… शरद पवारांची खडसेंवर प्रतिक्रिया  

News Desk

‘निवडणुकीला उभं करून पाडायचं षडयंत्र संजय काकांनींच रचलं’, भाजपाच्या माजी आमदाराचा खासदारावर गंभीर आरोप!

News Desk