HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोना स्टेज २, कोरोनाग्रतांची संख्या ३९ वर

मुंबई | राज्यात कोरोनग्रस्तांची संख्या दिवसेदिवस वाढतच चालली आहे. सद्यस्थितीला राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. “महाराष्ट्रात कोरोनाची स्टेज २ वर पोहोचली आहे. दरम्यान,कोरोनाबाधितांची प्रकृती स्थिर आहे. यातील १८ ते १९ व्यक्ती परदेशातून आले आहेत आणि जे लोक यांच्या सानिध्यात आले आहेत त्यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी, युएस, सौदी अरेबिया, दुबई या देशातून येणाऱ्यां लोकांची A,B, C या यादीत विभागणी केली जात आहे. तसेच यात ज्या व्यक्ती होम कोरेनटाईन करत आहेत त्यांच्या हातावर निळ्या रंगाचा शिक्का लावण्यात येईल. त्यामुळे जर तो व्यक्ती घराबाहेर पडला तर त्याला ओळखता येणे शक्य होईल,” असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, महाराष्ट्रातील सर्व शाळाही बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, रेल्वे स्टेशन दिवसातून दोन वेळा धुण्याचे आदेश दिले आहेत आणि सर्व स्टेशनच्या वॉशरुममध्ये साबण, सॅनिटायझर ठेवा अशाही सूचना आरोग्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
मंत्रालयात कामानिमित्त भेटीसाठी येणाऱ्यांना मनाई केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी जास्त लोकांना ऑफिसमध्ये बोलावू नका. तसेच निवडणूक आयोगाला निवडणुका पुढे ढकलाव्या अशा सूचनाही केल्या आहेत. निवडणुकांच्या बाबत सर्व पालिका, नगरपंचायत इतर सर्व निवडणुका ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिल्लोड-सोयगाव तालुक्याच्या विकासासाठी जलसंधारण प्रकल्पांच्या कामांना गती द्या! – अब्दुल सत्तार

Aprna

मला पाडून दाखवा ,अजित पवारांचं मुनगंटीवारांना चॅलेंज !

News Desk

चाकण हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून २० जण ताब्यात

swarit