HW News Marathi
महाराष्ट्र

लातूरच्या पाण्यासाठी आमिरने केले श्रमदान

लातूर – रेल्वेने पिण्याचं पाणी आणण्याची नामुष्की ओढवलेल्या लातूरसाठी अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव पुढे सरसावली आहेत. पाण्याचा दुष्काळ दूर कऱण्यासाठी आमिर आणि किरण यांनी स्वतः श्रमदान केलं.

लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (गौर) आणि तगरखेडा या दोन गावात पाणी चळवळीच्या कामासाठी आमिर खान आणि त्याची पत्नी किरणनं श्रमदान केलंय. आमिर खानने मंगळवारी चक्क लातूर जिल्ह्यात मांजरा आणि तेरणा नदीच्या पट्ट्यात फावडा आणि टिकाव चालवला. एका गावात २० मिनिटे तर दुस-या गावात चार तास खर्च केलेल्या या अभिनेत्याने नुस्ते श्रमदानच केले नाही तर पाण्याची समस्या गावक-यांना कशी आहे ? याची माहिती घेतली. उपाय काय केला पाहिजे ? याचा कानोसा घेतला.

राज्याचे कामगारमंत्री आणि लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या विधानसभा मतदारसंघातील निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) आणि तगरखेडा ही ती दोन गावे आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाली आहेत. या दोन्ही गावचे गावकरी मोठ्या प्रमाणात श्रमदान करुन पाणी मोहिम राबवित आहेत. त्यांच्या या चळवळीला आज आमिर खानने स्वत: उपस्थित राहून आपल्या पाणी फाऊंडेशनचे बळ दिले. एवढा मोठा अभिनेता आपल्या गावात आपल्या पाण्यासाठी खोरे – टोपले घेऊन काम करतोय, याने गावक-यांच्या आनंदाचा पारावार राहिला नाही.

सुरक्षेच्या कारणावरुन पोलिसांनी व्हीव्हीआयएमपी माणूस येणार एवढेच कळविले होते. त्यामुळे ‘आमीर येणार’ ही बातमी गुप्त राहिली. मात्र तरीही पोलिसांचा भलामोठा फौजफाटा पाहिल्यावर कुणीतरी मोठा माणूस येणार म्हणून गर्दी जमली ती जमलीच. तगरखेडा शिवारातील प्रत्येकाच्या शेतात संध्या बांध बखिस्तीचे काम चालू आहे. आमीर खानने डॉ. शरद मठपती यांच्या शेतात बांध बंधिस्ती करुन श्रमदान केले.

आनंदवाडी गौर या गावात आमिर खानने गावातील पाणी चळवळीतील १५ पुरुष आणि १५ महिलांची एका घरात बैठक घेतली. त्यांच्याकडून पाण्याच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना काही सूचनाही केल्या. तुम्ही श्रमदान करा, तुमच्या गावाला आमिर खान पाण्यासाठी लागेल तेवढे पैसे देईल, असे आश्वासन आमिरने यावेळी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सत्ताधाऱ्यांचे कामकाज रोखण्याशिवाय विरोधी पक्षाने काय दिवे लावले?”, सामनातून भाजपला सवाल

News Desk

संभाजी भिडे गुरूजींना मुख्यमंत्री पाटीशी घालत आहेत | राजा ढाले

News Desk

राज्याचा द्वेष करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो…!, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना खडेबोल

Aprna