HW News Marathi
महाराष्ट्र

वेणा तलावात दहा जण बुडाले

नागपूर- फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांनी जलाशयाच्या मधोमध जाऊन डोंग्यात सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतला असून त्यात 10 जण बुडल्याची शक्यता आहेत.

रविवारी सायंकाळी अमरावती महामार्गानजिक असलेल्या वेणा जलाशयात ही घटना घडली असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, सध्या बचावकार्य सुरू आहे. मच्छीमार तसेच अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले असून त्यांनी तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अंधारामुळे बचाव कार्यात मोठा अडथळा येत आहे.

आठवा मैलवाडी तसेच आजूबाजूच्या परिसरात राहणारे तरुण गुरुपोर्णिमेच्या पर्वावर पिकनिक करण्यासाठी धामणा जवळच्या वेणा जलाशय परिसरात गेले होते. खाणेपिणे केल्यानंतर सायंकाळी ६.३० च्या सुमारास नावचालकासह ११ तरुण नावेत बसले होते. जलाशयाच्या काठावरून बराच आतमध्ये नाव गेला. त्यावेळी आतमधील तरुणांना सेल्फी काढण्याची हौस झाली. त्यामुळे सारेच्या सारे एकाच बाजुला झाले. परिणामी डोंग्याचे संतूलन बिघडले आणि नाव उलटली. नाव चालक अतुल ज्ञानेश्वर बावणे (वय २२, रा. पेठ कालडोंगरी) याला पोहता येत होते. अन्य कुणालाही पोहता येत नसल्याने अतुल वगळता सर्वच्या सर्व पाण्यात बुडाले. अतुल कसा बसा पोहत काठावर आला. त्यानंतर त्याने आजुबाजुला काम करणाऱ्यांना नाव बुडाल्याची माहिती दिली. त्यानंतर बचाव कार्य सुरू झाले. रात्री उशिरा तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांची अद्याप ओळख पटली नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूर शहराच्या उपराजधानी दर्जाला लक्षात घेऊन भरीव निधी देणार! – अजित पवार

Aprna

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ८ जण कोरोना पॉझिटिव्ह

Aprna

कर्जमाफी प्रकियेतील आधार कार्डचा घोळ

News Desk