HW News Marathi
महाराष्ट्र

शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची फेरतपासणी करावी 

वाहन तपासणी न केल्यास परवाना रद्द तथा प्रसंगी वाहन जप्ती देखील करण्यात येईल – प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम बाबळे

नांदेड :- उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची सुरक्षा विषयक फेरतपासणी करण्यात येणार असून ही तपासणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे असे प्रादेशिक परिवहन अधिकारी,प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांनी कळविले आहे.

शालेय मुलांची वाहतूक करण्यासाठी नोंद केलेली (स्कूल बस) ,आदी वाहने हे सुरक्षाविषयक तरतुदीचे काटेकोरपणे पालन करतात किंवा करत नाहीत याबाबत ही तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी पूर्णत: निशुल्क असून मोटार वाहन कायदा कलम ५६ अंतर्गत वाहनाचे जारी केलेले योग्यता प्रमाणपत्र वैध असले तरीही स्कूल बसची चाचणी करुन घेणे बंधनकारक आहे.योग्यता प्रमाणपत्र वैध आहे म्हणुन फेरतपासणीसाठी येणे टाळू नये. तसेच जे स्कूलबस धारक या तपासणीसाठी वाहन कार्यालयात सादर करणार नाहीत त्यांचा परवाना रद्द करण्यात येवून वाहन तपासणीमध्ये ते जप्त करण्यात येईल.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून सर्व स्कूल बसचे चालक, मालक यांनी आपल्या वाहनाचे वैध कागदपत्रे, वाहनाचा परवाना व वाहनासह प्रादेशिक परिवहन कार्यालयात तपासणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Exclusive Chandrakant Patil | उद्धव ठाकरेंना हळूहळू कळेल, ‘हे’ लोक कसे फसवितात ते !

swarit

“सात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री हैं”,मुनगंटीवारांनी डिवचलं!

News Desk

कोल्हापूर पालिकेतील १९ नगरसेवकांचे पदे रद्द

swarit