HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या दबावानंतर शासकीय कार्यालयातील देवदेवतांच्या प्रतिमांचा निर्णय रद्द होणार

मुंबई – शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी आज सकाळी दहा वाजतां भेटले. सरकारी कार्यालयातील देव देवतांची छायाचित्रे काढून टाकण्याचे परिपत्रक तत्काळ मागे घेण्याची व ज्या अधिका-याने हे परिपत्रक काढले, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली. त्याप्रमाणे परिपत्रक तत्काळ मागे घेऊन संबंधित अधिका-यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दिले.

कालच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबतची युती संपुष्टात आल्याची घोषणा केल्यानंतर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे अजूनही युतीचे दरवाजे पूर्णपणे बंद झालेले नसल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

Aprna

“या PI लगडचा बाप कोण आहे, ते आम्ही शोधून काढू”, चित्रा वाघ कडाडल्या 

News Desk

प्रदेश काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलच्या प्रदेशाध्यपदी उमाकांत अग्निहोत्री यांची नियुक्ती

Aprna