HW News Marathi
महाराष्ट्र

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे – संत तुकारामहाराजांच्या पालखीने आज दुपारी टाळ-मृदुंगाच्या तालावर विठुरायाचा नामघोष करत देहूगावातील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. हजारो वारकरी लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी या पालखीत सहभागी झाले आहेत.

देहुनगरीमध्ये राज्यभरातून वारकरी दाखल झाले आहेत. त्यातच पावसानं हजेरी लावल्यानं वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. इंद्रायणी नदीचा काठ भाविकांच्या गर्दीने फुलून गेला. पंढरपुरच्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेले वारकरी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 321 दिंड्या देहूत दाखल झाल्या आहेत. मुख्य देऊळवाड्यात पहाटेपासून वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली. देहू ग्रामपंचायत प्रशासनाने सोहळ्यातील भाविकांना विविध सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून तयारी पूर्ण केली आहे. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक संस्थांनी नागरिकांनी सहभाग घेतला आहे.

आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळ्याच्या प्रस्तानाची सुरुवात झाली. पालखीचे पुजा करण्यात आली. चारच्या सुमारास टाळ मृदुंगाच्या गजरात व तुकोंबाच्या जयघोषात पालखी सोहळ्याचे प्रस्तान झाले. शासनाच्या वतीने निर्मल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने विविध ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मानकरी, सेवेकरीही दाखल झाले. असल्याची माहिती अभिजित मोरे, सुनील महाराज मोरे, जालिंदर महाराज मोरे यांनी दिली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी वारकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी, शहा यांना समजण्यासाठी राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील !

News Desk

“रझा अकादमीची एवढी ताकद नाही, यामागे वेगळेच लोक!”

News Desk

शिवेंद्रराजे यांना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याकडून पक्षात येण्याची ऑफर

News Desk