HW News Marathi
महाराष्ट्र

हिंदी भाषेतून पासपोर्टसाठी अर्ज करणे शक्य, इंग्रजी अवगत नसऱ्यांनाही दिलासा

नवी दिल्ली । विदेशात प्रवास करणे पासपोर्टशिवाय अशक्यच. परंतु पासपोर्ट सहज मिळावा यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून अवघ्या दहा दिवसांत ऑनलाइन अर्ज करून आपण पासपोर्ट मिळवू शकता. अर्ज करण्यासाठी हिंदी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे इंग्रजी भाषा अवगत नसणाऱ्यांसाठी एक पर्याय देण्यात आला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या एका तरतुदीनुसार पासपोर्टसाठी आता हिंदी भाषेतूनही अर्ज करता येणार आहे. संसदीय समितीच्या नवव्या अहवालातील अधिकृत भाषे संबंधातील शिफारशी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला आहे.

काही दिवसांपूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टसाठी आधार कार्ड जन्मदाखल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल, असा अध्यादेश काढला होता. या निर्णयामुळेही पासपोर्ट प्रक्रिया सोपी होण्यास मदत झाली आहे. पासपोर्ट अधिनियम 1980 नुसार 26 जानेवारी 1989 या दिवशी किंवा त्यानंतर ज्यांचा जन्म झालाय त्यांना पासपोर्टसाठी जन्म दाखला सादर करणे सक्तीचे होते. मात्र, सुधारित नियमांनुसार आता परराष्ट्र खात्याने आणखी काही पर्याय दिले असून, जन्म दाखल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मलिकांच्या प्रकरणांचं सर्व पुरावे शरद पवारांकडे देणार!; फडणवीसांचा इशारा

Gauri Tilekar

देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूर दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘या’ केल्यात मागण्या!

News Desk

पूर परिस्थिती असताना, तुम्ही निवडणुकांचा विचार तरी कसा करून शकता !

News Desk