HW News Marathi
मनोरंजन

गांधींनी सुट सोडून धोतर का परिधान केले ?

अपर्णा गोतपागर | मोहनदास करमचंद गांधी यांनी १८८८ साली इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेताना सूट घातला होता. तसेच गांधी यांना ३३ वर्षानंतर १९२१ साली देशातील मदुराई येथे फक्त धोतर दिसले तेव्हा हे सर्व आश्चर्य चक्कित करणारी गोष्ट आहे. गांधींनी धोतर व्यतीरिक्त कधी कोणते कपडे परिधान केले यावर तुम्हाला विश्वास विश्वास बसणार नाही. परंतु गांधींनी सूट सोडून धोतर का? परिधान केले या मागचे खरे कारण तुम्हाला कळाले तर तुमच्या मनात गांधींजींबद्दल आदर अजूनच वाढेल.

गांधींनी सत्याग्रहाचा पहिला यशस्वी प्रयोग बिहारमध्ये केला होता. या सत्याग्रहसाठी गांधी चंपारणच्या मोतिहारी स्टेशनवर १५ एप्रिल १९१७ साली दुपारी उतरले होते. तेव्हा शेतकरी आणि महिला आपली व्यथा सांगण्यासाठी स्टेशनवर आले होते.ब्रिटिश सरकार शेतक-यांना फक्त नीळची शेती करण्याची जबरदस्ती करत होते. नीळच्या उत्पादना व्यतिरिक्त दुसरे कोणते ही पीक न घेण्याची सक्ती ब्रिटिशांनी केली होती.

तसेच शेतक-याबरोबर आलेल्या महिलांनी गांधींना त्यांची व्यथा सांगितली की, पिण्याचे पाणी घेण्यासाठी रोखले जाते. त्याचबरोबर शौचालय जाण्यासाठी वेळ निश्चित करण्यात आला होता. त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असून या सर्व लहान मुलांना ब्रिटिशांच्या फॅक्टीरमध्ये नोकरी देण्यात येत होती. या कामाच्या मोबदल्यात सर्वांना एक जोडी कपडे दिले जात होते.

जेव्हा गांधी चंपारणमध्ये पोहचले तेव्हा त्यांनी कठियावाडी पोशाख परिधान केला होता. यात एक शर्ट, धोतर, घडी, सफेद गमछा,चमड्याचा बूट असे कपडे परिधान करुन आले होते. ब्रिटिशांनी नीळ फॅक्ट्रीमध्ये काम करणा-या पुरुष आणि महिला़ना बूट घालण्यास बंदी घातली होती. गांधी ब्रिटिश अधिका-यांना १९१७ साली अधिका-यांना पत्र लिहून चंपारण सोडण्याचे आदेश दिले होते. या पत्रात गांधींनी शेक-यांची दयनीय अवस्थे बद्दल लिहले होते. यात गांधींनी महिला, लहान मुलांसाठी शाळा आणि आश्रम चालविण्यावर भर दिला होता.

सत्याग्रहाच्या दुस-या पर्वाला सुरुवात

८ नोव्हेंबर १९१७ साली गांधींच्या सत्याग्रहच्या दुस-या पर्वाला सुरुवात झाली होती. सत्याग्रहसाठी चंपारणमध्ये कार्यकर्ते,अनंतिका बाई, गांधींची पत्नी कस्तूरबा गांधी, मनीबाई पारीख, आनंदीबाई, श्रीयुत दिवाकर (वीमेंस युनिवर्सिटी ऑफ पुणा की रजिस्ट्रार) मध्ये या सत्याग्रहात सामील झालेल्या महिलांची नावे आहेत.

या लोकांनी तीन शाळा सुरू केल्या असून हिंदी आणि ऊर्दूमध्ये मुली आणि महिलांनी शिक्षण घेण्यास सरुवात झाली. याचबरोबर महिलांना शेती आणि विनकाम हे देखील शिकविले जात होते. लोकांना विहिर आणि नाल्यांची साफ-सफाई कशी करावी याचे प्रशिक्षण देखील दिले जात होते.

गांधींनी कस्तूरबा सांगितले होते की, महिलांना दररोज आंघोळ आणि स्वच्छ ते बदल काही गोष्टी सांग जेव्हा कस्तूरबा गांधी यांनी महिलांना स्वच्छते बदल सांगण्या प्रयत्न केला तेव्हा एक महिला त्यांना म्हटली की,’बा, माझ्या घरची परिस्थिती तुम्ही पाहा, तुम्हाला कुठेही सूडकेस किंवा कपाट नाहीये की, जेणे करुन मी त्यात कपडे भरुन ठेवीन, माझ्याकडे एक साडी आहे. मी तिच साडी परिधान करते. आता तुम्ही मला सांगा. की साडी धुतल्यानंतर माझ्याकडे दुसरी साडी द्या. की, जेणे करुन मी रोज एक साडी धुऊ शकते.’

गांधींनी हे ऐकल्यानंतर त्यांनी त्यांचा ‘चोगा’ बाना दिले. आणि त्या महिलांना देण्यास सांगितले. यानंतर गांधींनी चोगा ओढने बंद केले. या सत्याग्रहानंतर गांधींनी गुडघ्यापर्यंत लांब असे धोतर घालण्यास सुरुवात केली.

गांधींनी पगडी घालणे सोडले

१९१८मध्ये अहमदाबाद कारखान्यातील कामगारसाठी लढण्यास सामील झाले होते. त्यावेळी गांधींनी पाहिले की, त्याच्या पगडीमध्ये जेवढे कपडे लागत होते. त्यात ‘जवळपास चार लोकांचे शरिर झाकले जावू शकते.’ त्यानंतर गांधींनी पगडी घालणे सोडून दिले.

गांधीनी केला धोतराचा स्वीकार

गांधींनी म्हणतात की, “मी कोणत्याच प्रकारचा तर्क की सत्य समजून घेतले की, माझ्याकडे टोपी आणि गुघ्यापर्यंत धोतर होते. परंतु ही वेशभुषा अर्धसत्य सांगते. चार इंचचे लंगोटसाठी हट्ट करणा-या लोकांची निर्वस्त्र कडवट सत्य सांगत आहे. मी त्यांना काय उत्तर देऊ की, जोपर्यंत मी जेव्हा पंगतीमध्ये त्याच्यासोबत उभा राहु शकतो. मदुराईमधील एक सभा संपल्यानंतर दुस-या दिवशी कपडे सोडून मी स्वत: गांधी त्या लोकांसोबत उभे राहिले.”

गांधींचे छोटे धोतर आणि शॉल हे सत्याग्रहाचे प्रतीक बनले. या नंतर गांधींना गरीबांसोबत एकजुटीबरोबर सम्राज्यवाद्यांनी देशाला कसे कंगाल केल्याचे दाखविले. चंपारणच्या पहिल्या सत्याग्रहच्या ३० वर्षानंतर भारताला १९४७ला स्वतंत्र मिळाले होते. हे स्वतंत्र दोनशे वर्षानंतर गुलागिरीचा अंत होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

FLASHBACK 2018 : भारतीय अंध क्रिकेट संघ जगात सरर्वोत्तम

News Desk

केतकी माटेगावकर, रोहित राऊत आणि वैशाली माडे यांचे “अहिल्या”साठी पार्श्वगायन

News Desk

जाणून घ्या…कुंभमेळ्यात येणाऱ्या १४ आखाड्यांबद्दल

News Desk