HW News Marathi
मुंबई

आकाशवाणीचे वृत्त निवेदक संपावर

पुणे – राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित न होण्याचीनामुष्की आकाशवाणीच्या इतिहासात बुधवारी पहिल्यांदाच ओढावली आहे. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रातील वृत्त निवेदकांनी संप केल्याने बुधवारी सकाळी हा प्रकार घडला.

४ जूनपासून हे बातमीपत्र दिल्लीऐवजी मुंबईतून प्रसारित केले जात आहे. मात्र, बातमीपत्र प्रसारित करण्यासाठी सुविधा नसल्याचे मुंबई केंद्राने यापूर्वी कळवले होते व संपाचा इशाराही दिला होता. अखेर मंगळवारपासून कंत्राटी वृत्तनिवेदकांनी संप पुकारला आहे.

पूर्वी पुणे आकाशवणी केंद्रावरून सकाळी 8.30वाजता, दुपारी 1.30 वाजता आणि रात्री 8.30 वाजता ही राष्ट्रीय बातमीपत्र प्रायोजकत्व घेऊन प्रसारित व्हायची. याद्वारे शासनाला 4 कोटी रुपयांचा महसूलदेखील मिळायचा. मात्र केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही बातमीपत्र मुंबईमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र यासाठीची आमच्याकडे सुविधा उपलब्ध नाही, असे सांगूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे ही बातमीपत्र मुंबईवरून प्रसारित होत असून त्याचे पद हे पुण्याला देण्यात आले आहे. तर दुसरीकडे, सकाळचे8.30 वाजताचे बातमीपत्र पुणे आकाशवाणी केंद्र प्रसारित करायला तयार आहे, ते आम्हाला देण्यात यावे, अशी मागणी पुणे केंद्रानं केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रदीप शर्मा पुन्हा पोलीस सेवेत

News Desk

काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांची आत्महत्या

News Desk

मेट्रो-३ मार्गिकेचे नयानगर-दादरपर्यंतचे भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण

News Desk