HW News Marathi
मुंबई

काळ्या पैशावाल्यांसाठी धोक्याची घंटा

  • स्विस बँकेतील खात्याची मिळणार भारताला माहिती

नवी दिल्ली – भारतासह अन्य ४० देशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्वित्झर्लंडच्या विविध बँकांमध्ये असलेल्या वित्तीय खाती आणि काळ्या पैशासंबंधीच्या माहितीच्या देवाण-घेवाण करण्यासाठीच्या प्रस्तावाला आज स्वित्झर्लंड सरकारनं मंजुरी दिलीय. त्यामुळं आता ज्या भारतीयांचा काळा पैसा स्विस बँकेत जमा आहे, त्याची माहिती मिळण्याच्यादृष्टीनं हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जातोय.

या प्रस्तावामुळं आता या ४० देशांना प्रस्तावाप्रमाणे गोपनीयता आणि सूचनांच्या सुरक्षेचं पालन करावं लागणार आहे. जागतिक पातळीवर इतर देशांशी करासंबंधी माहितीचे आदान-प्रधान करण्यासंबंधीच्या प्रस्तावाला स्वित्झर्लंडच्या संघीय परिषदेनं मंजुरी दिली आहे. स्वित्झर्लंड सरकार वर्षं 2018पासून या सूचना अंमलात आणणार आहे. तसेच या सूचनेअंतर्गत आकड्यांची आदानप्रदान 2019मध्ये होणार आहे. स्वित्झर्लंडची संघीय परिषद सूचनांची देवाण-घेवाणीची व्यवस्था सुरू करण्यासंबंधीची तारीख लवकरच भारताला कळवणार आहे. लवकरात लवकर या सूचनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, एका विद्यार्थिनीचा मृत्यू

swarit

उल्हासनगरमध्ये ‘स्पेशल 26’ चं रॅकेट उध्वस्त

News Desk

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, अवधूत तटकरे शिवबंधनात

News Desk