HW News Marathi
मुंबई

खड्ड्याने घेतला बाइकपटुचा बळी

मुंबईः जव्हार-डहाणू मार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघातग्रस्त होऊन प्रसिद्ध महिला बाइक रायडर जागृती होगळेचा (३५) मृत्यू झाला. वेती येथील या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. येथील स्थानिक ग्रामपंचायतीने याठिकाणी गतिरोधक निर्माण करावे म्हणून लेखी मागणी पत्रही दिले आहे; मात्र त्याची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग घेत नसल्याने अपघात होत आहेत. जागृतीच्या बुलेटला इथेच अपघात झाला. जागृती ही वुमन्स ओन्ली बायकर्सची ग्रुपच्या सदस्या होती. तिने लेह आणि लडाखचीही बाइक सफर केलेली होती. ती मृणाल नायर आणि ज्ञानदा म्हसकर या नवी मुंबईत राहणाऱ्या दोन अन्य क्लब सदस्यांसह बाइक रायडिंगला जव्हारला निघाली होती. जागृती मुंबईतील वांद्रे-खेरनगर येथील श्रीराम हाऊसिंग सोसायटीत राहायची. तिथूनच सकाळी ८ वाजताच्या सुमारास या तिघी तीन बुलेट घेऊन निघाल्या. दरम्यान, जव्हार-डहाणू मार्गावर वेती येथे एका ट्रकला ओव्हरटेक करत असताना बाइक खड्ड्यात गेली आणि जागृती खाली कोसळली. ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन तिचा जागीच मृत्यू झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनपा शाळेच्या मैदानावरील अतिक्रमण हटविले

swarit

ओला-उबरच्या चालकाला मारहाण

Gauri Tilekar

मुंबई विद्यापीठांमधील व कॉलेजच्या (कॅंन्टीन) सुरक्षा धोक्यात

News Desk