HW News Marathi
मुंबई

मुंबईची परिस्थिती हाताबाहेर गेल्यास हेलिकॉप्टर, बोटीचा वापर

मुंबई- येत्या चोविस तासांत मुंबई व परिसरात पुन्हा दमदार पाऊस पडण्याची शक्यता असून यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती असून त्यासाठी प्रशासनाने सर्वोतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्यास हेलिकॉप्टर तसेच बोटींची मदत घेण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे. दरम्यान आजच्या पावसाने सर्व जनजीवन विस्कळीत झाले. अनेकजण कार्यालयातच अडकून पडले आहे. काही ठिकाणी महिला व मुले दिवसभर ट्रेनमध्ये अडकून पडले होते. सायन परिसरात एक गर्भवती महिला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ट्रेमध्ये अडकून पडली आहे. सायंकाळी ट्रेनच्या दरवाजापर्यंत पाणी आले होते. परंतु त्यातून चालणे शक्य होणार नाही. अनेक गणेश मंडळ, सामाजिक संघटना, धर्मदाय संघटांना पुरामुळे अडकलेल्या नागरिकांसाठी निवासस्थान तसेच भोजनाची व्यवस्था करून मुंबईकरांनासाठी मदताची हात पुढे केला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खाजगी विद्यापीठातही मागासवर्गीय विद्यार्थ्याना फी प्रतिपूर्ती द्या

News Desk

पाऊस आला रे…

News Desk

दादरमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळा संपन्न

News Desk