मुंबईः विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यातील खड्डे हा कळीचा मुद्दा या अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, तूर खरेदीचा प्रश्न, झोपुतील घोटाळे, कायदा आणि सुव्यवस्था या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी विरोधकांनी परंपरेनुसार चहापानावर बहिष्कार घातला मात्र विरोधकांमध्ये रविवारी पडलेली फूट सोमवारी दिसली नाही. सोमवारी सकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठक झाली.
खड्डेमुक्त रस्ते दाखवणाऱ्या मंत्र्याला विरोधक देणार बक्षीस
– ‘खड्डे दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा’ अशी घोषणा मागिलवर्षी भाजप मंत्र्यांनी केली होती. त्यानंतर बरेच ‘पाणी’ वाहून गेले आणि रस्त्यातील ‘झोल’ उघड झाले. रस्त्यांतील खड्यांवरुन सरकारला घेरण्याची तयारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह सर्व विरोधकांनी केली आहे.
– सत्ताधाऱ्यांनी केलेल्या ‘खड्डे दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा’ या प्रचारकी घोषणेवरुन त्यांनाच घेरण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आवाहन केले आहे, की खड्डेमुक्त रस्ते दाखवले तर मंत्र्यांनाच आम्ही बक्षीस देऊ.
– दरम्यान, मुंबईतील खड्ड्यांवरुन आरजे मलिष्काने बीएमसीची टर उडवली होती. आता राज्यातील रस्त्यांवर विरोधक एकवटले असताना शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.