HW News Marathi
मुंबई राजकारण

केंद्रीय मंत्री अमित शहा आज मुंबईत दाखल होणार; उद्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेणार

मुंबई । देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येणार आहे. अमिश शहा हे आज (४ सप्टेंबर) रात्री ९. ३० वाजता मुंबईत दाखल होणार आहेत. यानंतर अमित शहा रात्री सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी असणार असून ते उद्या (५ सप्टेंबर) सकाळी ९ वाजता मुंबई दौरा सुरू होणार आहे. अमित शहा हे पहिल्यात लालबागचा राजा आणि सिद्धिविनायक यांचे प्रथम दर्शन घेणार असून यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेणार आहेत.

अमित शहा मुंबई दौऱ्यावर येणार असल्यामुळे काल (३ सप्टेंबर) रात्रीपासून वेगवेगळ्या चौक्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. तसेच शहांचे मुंबई आगमन होण्यापूर्वीच मुंबई पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  शहा हे मुंबई महापालिकेच्या दृष्टीने त्यांचा मुंबई दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. या पार्श्वभूमीवर मुंबईत शहांच्या नेतृत्वाच कोअर कमिटीची बैठकची एक महत्वापूर्ण बैठक होणार आहे. गेल्या २५ वर्षापासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीत भाजपवर पताका फडविण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.

 

 

Related posts

सांगलीचे खासदार संजय पाटील यांना मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा!

News Desk

जवानांचा जय व किसानांचा पराजय असे होऊ नये !

News Desk

मी राजकारण सोडून देईन !

News Desk