HW News Marathi
मुंबई

चित्रपटगृह मालक विनामूल्य दाखवणार वृक्षलागवडीचे संदेश

मुंबई – राज्यात दि. १ जुलै ते ७ जुलै २०१७ या कालावधीत ४ कोटी वृक्ष लागवड होणार असून या कार्यक्रमात राज्यातील अधिकाधिक जनतेने सहभागी व्हावे यासाठी सर्व सिनेमागृहांनी वृक्ष लागवडीचा संदेश मनामनात पोहोचवावा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले..

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मल्टिप्लेक्स आणि एक पडदा थिएटर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस वन सचिव विकास खारगे यांच्यासह आयनॉक्स, पीव्हीआर, सिनेमा ओनर असोसिएशनचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

वनमहोत्सवाच्या निमित्ताने राज्यात होणाऱ्या वृक्ष लागवडीचे दृकश्राव्य संदेश विभागाने तयार केले आहेत ते सर्व सिनेमागृह मालकांनी त्यांच्या थिएटरमध्ये विनामूल्य दाखवावेत असे आवाहन वनमंत्र्यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, लोकांच्या मनात वृक्ष लागवडीचे बीजारोपण करण्यासाठी, त्यांच्या मनात वृक्ष लावण्याची इच्छा निर्माण करण्यासाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यात थिएटर असोसिएशन्सनी सहकार्य करावे, हे मनाला समाधान देणारे कार्य आहे.

थिएटर्सना ज्या फॉर्मेटमध्ये वृक्ष लागवडीचे संदेश हवे आहेत त्या फॉर्मेटमध्ये त्यांना हे संदेश देण्यात यावेत अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. वृक्ष लागवडीचे महत्व आणि त्याची गरज व्यक्त करणारा पाठ शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाला कळविण्यात यावे असेही ते यावेळी म्हणाले.

बैठकीस उपस्थित मल्टिप्लेक्सधारक, एक पडदा सिनेमागृह चालकांनी वन विभागाचे वृक्ष लागवडीचे सर्व संदेश विनामूल्य दाखवण्यात येतील तसेच वृक्ष लागवडीची जनजागृती करतांना वृक्ष लागवडीच्या कामात सहभागी होण्यास देखील आवडेल, असे यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

बोटीतून गरोदर महिलेला रुग्णालयात पोहचवले

News Desk

मुंबई महापालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरुमच्या निविदेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा! – आशिष शेलार

Aprna