HW News Marathi
मुंबई

जिल्हा बँकांतील जुन्या नोटा स्विकारणार आरबीआय

नवी दिल्ली – जिल्हा बँकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नोटाबंदीमुळं जिल्हा सहकारी बँका काहीशा अडचणीत सापडल्या होत्या. नव्या निर्णयामुळं आता जिल्हा बँकांमध्ये जमा झालेल्या पाचशे आणि एक हजार रूपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेमध्ये जमा करता येणार आहे. जुन्या नोटा जमा करण्यासाठी तसेच त्याबदल्यात नवीन नोटा घेण्यासाठी जिल्हा सहकारी बँकांना तसेच पोस्ट ऑफिसनाही तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे. येत्या २० जुलैपर्यंत जुन्या नोटा जमा करण्याची मुदत आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेनं सामान्य नागरिकांसाठी नवीन चलनबदलासाठी ठरावीक कालावधी दिला होता. मात्र, त्यानंतरही जिल्हा सहकारी बँकांकडून जुन्या नोटा बदलून देण्यासाठी मुदतवाढीची मागणी सातत्यानं केली जात होती. त्याची दखल घेत नव्यानं ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

बँका आणि टपाल कार्यालयानांदेखील 30 डिसेंबर, 2016 पूर्वी जमा झालेल्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून बदलून घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आधी या नोटा का जमा झाल्या नाहीत याचे स्पष्टीकरण देखील जिल्हा बँकांना द्यावं लागणार आहे.

जिल्हा बँकांकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी रोकड नसल्याची बाब समोर आल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेने गेल्यावर्षी 14 नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून जिल्हा सहकारी बॅंकांना रोकड स्वीकारण्यास आणि चलनबदल करण्यास बंदी घातली होती. जिल्हा सहकारी बॅंकांना परवानगी दिल्यास त्या काळा पैसा पांढरा करण्याचे केंद्र बनतील अशी भीती केंद्र सरकारने व्यक्त केली होती. त्यानंतर, महाराष्ट्रात शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी राज्यातील जिल्हा बँकांकडे जमा झालेल्या 2,270 कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून बदलून मिळाव्यात ही मागणी उचलून धरली होती. त्यादृष्टीनं हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जे. जे. हॉस्पिटलमध्ये दोन डॉक्टरांना मारहाण

News Desk

शिवसैनिकांसाठी वाघाची अंगठी

swarit

डॉनला झटका, चार हजार कोटींची मालमत्ता जप्त

News Desk