HW News Marathi
मुंबई

ठाण्यात पालिका पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला-तीन जण जखमी-दोघांना घेतले ताब्यात

हल्लेखोरात युवा सेनेचा कार्यकर्ता असल्याची चर्चा…. 30 टपऱ्या जमीनदोस्त

ठाण्याच्या रामचंद्र नगर वागळे इस्टेट परिसरातील वैतीवाडी परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई करण्यास गेलेल्या पालिका पथकावर मस्तवाल फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. मस्तवाल फेरीवाल्यांच्या हल्ल्यात पालिकेचे तीन कर्मचारी जखमी झाले. या प्रकारामुळे वैतीवाडी परिसरात वातावरण तणावपूर्ण झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करीत हल्ला करणाऱ्या दोघं फेरीवाल्यांचा ताब्यात घेण्यात आल्याचे माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली. दरम्यान हल्लेखोरांमध्ये एक फेरीवाला हा युवा सेनेचा पदाधिकारी असल्याची चर्चा रंगली होती.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील वैतीवाडी भागात मोठ्या प्रमाणात अवैध फेरीवाल्यांनी उच्छाद मांडला होता. फेरीवाल्यांनी आणि अनधिकृत टपरीवाल्यानी चक्क रस्त्यावरच अतिक्रमण केल्याच्या तक्रारी नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे केल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी पालिकेचे अतिक्रमण पथक कारवाईसाठी वैती वाडी परिसरात गेल्यानंतर मस्तवाल फेरीवाल्यांनी पथकावर लाठी काठीच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला. त्याचवेळी संरक्षणासाठी तैनात पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान या झटापटीत पालिका पथकातील तीन कर्मचारी जखमी झाले. या प्रकारानंतर पालिका पथकाची सुरक्षा वाढविल्याने पथकाने जवळपास 30 टपऱ्या आणि हातगाड्या जेसीबीच्या साहाय्याने जागेवरच नष्ट करण्यात आल्या. दरम्यान वागळे पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे . त्यात एक फेरीवाला हा युवा सेनेचा पदाधिकारी असल्याची चर्चा आहे . मात्र पोलिसांनी याला दुजोरा दिला नाही .

ठाण्यात काही फेरीवाला दादा, पोलीस आणि पालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे. याचाच फटका कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकांना परिणाम भोगावे लागतात. काही दिवसांपूर्वी पालिका उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाण करण्यात आली होती अनेकदा आशा हल्ल्याना अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते पण कुंपणच शेत खात असल्यामुळे फेरीवाल्यांची दादागिरी वाढली असल्याची ठाण्यात चर्चा रंगली आहे .आता पुन्हा आयुक्त संजीव जयस्वाल फेरीवाल्यांच्या विरोधात मोहीम घेतात का याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भुयारी मार्ग की, स्वीमिंग पूल…

swarit

पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर

News Desk

डॉ. मशहूर गुलाटी यांचा जागा घेणार राजू श्रीवास्तव

News Desk