HW News Marathi
मुंबई

भुयारी मार्ग की, स्वीमिंग पूल…

मुंबई | कुर्ला रेल्वे स्थानक येथून पूर्व आणि पश्चिमेकडे ये-जा करण्यांसाठी भुयारी मार्ग नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. शिवसेने ने त्याची दखल घेत नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकातून भुयारी मार्ग उभारण्याबाबत वारंवार पालिका प्रशासन आणि रेल्वेकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार प्रशस्त भुयारी मार्ग उभा राहिला असून त्याचे उद्घाटन अदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

मात्र सद्या या भुयारी मार्गाची दुराव्यस्था झालेली असून नागरिकांची गैरसोय झाली आहे. भुयारी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. पाण्याची गळती, लाईटची अपुरी व्यवस्था, अस्वच्छता तसेच मोठ्या प्रमाणावर आत गटाराचे पाणी साठते यामुळे डेंगू, मलेरिया सारख्या रोगांचा प्रसार करणाऱ्या डासांची पैदास होऊ शकते.या भुयारी मार्गाचे काम गेली अनेक वर्ष सुरु होते. या भुयारी मार्गचे २६ ऑक्टोंबर २०१७ रोजी उदघाटन करण्यात आले.

सदर भुयारी मार्गाचे गेली बारा वर्ष काम चालू होते. दरम्यान पालिकेने कोणतेही निरीक्षण केले नाही. भुयारी मार्ग हा कोणत्याही प्रकारे लिकेज नसला पाहिजे. उद्घाटनाच्या वेळी नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित होते. मोठ्या धुमधडाक्यात भुयारी मार्गाचे उदघाटन करण्यात आले. त्यामुळे उदघाटन करण्याच्या धुंदीत घाई गडबडीत परीक्षण तसेच निरीक्षण करायचे राहून गेले कि काय असा सवाल सध्या उपस्थित होतोय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांना ‘आयडॉल’चा दिलासा

News Desk

कल्याण,कुर्ला व ठाणे मुंबईतील तीन अस्वच्छ रेल्वे स्थानक

News Desk

रिलायन्सच्या कार्यालयावर कॉंग्रेसची पोस्टरबाजी

News Desk