HW News Marathi
मुंबई

डॉ. संजय देशमुखांनी मुंबई विद्यापीठाच्या १११ कोटींच्या ठेवी मुदतीपूर्वीच वटवल्या

मुंबई: अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणा-या मुंबई विद्यापीठाचा आर्थिक मनोरा डावाडोल असून गेल्या २२ महिन्यात आर्थिक चणचण भासताच १११ कोटींच्या ठेवी मुदत संपण्यापूर्वीच वटविल्याची धक्कादायक कबुली मुंबई विद्यापीठाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे. मुंबई विद्यापीठाच्या तिजोरीत खडखडात असतानाही अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आकडे फुगविल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे विविध बँकेतील ठेवी तसेच मुदतपूर्वीच मोडलेल्या ठेवीची माहिती विचारली होती. मुंबई विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाने गलगली यांना १ जुलै २०१५ पासून ३१ मे २०१७ पर्यंतची माहिती दिली. विविध बँकेतील १०० ठेवी मुदतपूर्वीच वटवला आहे.

अनिल गलगली यांनी याबाबत संताप व्यक्त करत कुलपती असलेले राज्यपाल यांस पत्र पाठवून ताबडतोब कुलगुरु डॉ संजय देशमुख यांस बरखास्त करण्याची मागणी केली आहे. आधीच निकाल वेळेत घोषित न करणारे डा.ॅ देशमुख आता ठेवी रक्कमेवर बोळा फिरवित आहे. अर्थसंकल्पाचे आकडे फुगवित नियोजनाच्या अभावी मुंबई विद्यापीठाची अवस्था दारुण झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आजपासून तीन दिवस बॅंका बंद असणार

swarit

मंत्र्यांना सत्तेची मस्ती चढली,जेष्ठ नागरिकांना लिफ्टमधून काढले बाहेर ,विरोधकांच्या तीव्र प्रतिक्रिया

swarit

उद्या या वर्षातला शेवटचा मेगाब्लॉक 

News Desk
देश / विदेश

पारंपरिक पौरहित्याला फाटा देत पुतळ्याला फेरे मारून केले लग्न

News Desk

भोपाळ- पारंपरिक विवाहपद्धतीला फाटा देत मध्य प्रदेशातील सिहोरमधील तरुण-तरुणीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती फेरे घेऊन सत्यसोधन पद्धतीने लग्न केले. या लग्नाचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियावर त्याची मोठी चर्चा आहे. पौराहित्य पद्धत हद्दपार करण्यासाठी नव्या पिढीने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊलं मानलं जात आहे.

मध्य प्रदेशमधील कल्लू जाटव आणि वैजंती राजोरिया यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला

सात फे-या मारून लग्न केले. काही सामाजिक संघटना आणि पुरोगामी नागरिकांच्या मतदीने हे कार्य पार पडले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने या जोडप्याने हे लग्न केल्याचे सांगितले जात असले तरी त्यांनी उचलले पाऊलं क्रांतीकारक असेच म्हणावे लागेल. अशा प्रकारच्या कार्यामुळे यापुढे पारंपरिक प्रचलित पौराहित्याची पद्धत हद्दपार होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related posts

पाक सरकारच्या संकेतस्थळावर चक्क भारताचे राष्ट्रगीत

News Desk

भारताने केलेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान ट्रोल

News Desk

शरद पवारच पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार! ,संजय राऊतांचं मोठं विधान

News Desk