HW News Marathi
मुंबई

दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या हत्येच्या कटप्रकरणी प्रिती जैनसह दोघं दोषी

  • आरोपींना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

मुंबई – दिग्दर्शक मधुकर भांडारकर याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणात अभिनेत्री प्रीती जैन आणि अन्य दोघांना न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेमुळं बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांचं नातं पुन्हा अधोरेखित केलं आहे.

२००५ साली प्रीती जैन हिने मधुर भांडारकरला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप होता. तिच्यावरील हा आरोप सिद्ध झाला असून न्यायालयाने शुक्रवारी तिला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यावेळी न्यायालयाने या प्रकरणातील अन्य दोन जणांची निर्दोष मुक्तताही केली. सरकारी पक्षाच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार, प्रीती जैन हिने अरूण गवळीचा सहकारी नरेश परदेशी याला सप्टेंबर २००५ मध्ये मधुर भांडारकर याला जीवे मारण्यासाठी सुपारी दिली होती. वर्षभरापूर्वी तिने मधुर भांडारकर याने बलात्कार केल्याचाही आरोप केला होता. मात्र, या प्रकरणी न्यायालयाने मधुर भांडाकरला २०१२मध्ये निर्दोष मुक्त केले होते. प्रीती जैन हिने यासाठी नरेश परदेशीला ७५ हजार रूपयांची सुपारी दिली होती. मात्र, नरेशने कामगिरी पूर्ण न केल्यामुळे प्रीतीने त्याच्याकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला होता. ही गोष्ट अरूण गवळीला समजल्यानंतर त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली होती आणि हे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी आठवडाभराच्या चौकशीनंतर १० सप्टेंबर २००५ रोजी प्रीती जैनविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी पोलिसांनी प्रीती आणि नरेश परदेशीचा मित्र शिवराम दास याला अटक केली होती. सुरूवातीला शिवडी येथील जलदगती न्यायालयात हा खटला सुरू होता. त्यानंतर हा खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला इंदूमिलची जागा देण्यासाठी 15 वर्ष लागले कुणी बांधले होते का ? : देवेंद्र फडणवीस

swarit

लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडिक यांचा गौरव

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

News Desk