HW News Marathi
मुंबई

लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडिक यांचा गौरव

मुंबई | शहिद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडिक यांचा संघवी पार्श्व ग्रुपच्या बुधवारी हॉटेल सेंटर रेगिस येथे झालेल्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. यावेळी संघवी पार्श्व ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रमेश संघवी आणि अभिनेत्री व पूर्वीची मिस. युनिव्हर्स सुश्मिता सेन यांच्या हस्ते ब्रँडच्या नव्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात ले. स्वाती महाडिक यांचा करण्यात आलेला गौरव हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

यावेळी लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडीक यांना संघवी पार्श्व ग्रुप आणि सीमा संघवी वेल्फर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई नाशिक द्रुतगती मार्गावरील आडगावच्या संघवी गोल्डन सीटी घरांच्या प्रकल्पात एक मोफत घर देण्यात येणार असल्याची यावेळी घोषणा करण्यात आली.

गौरव स्वीकारताना स्वाती महाडिक म्हणाल्या, देश सेवेबरोबरच आई म्हणून मुलांची काळजी घेण्याची जबाबदारीही माझ्या खांद्यावर आहे. त्यामुळे सध्या मला थोडी कसरत करावी लागत आहे. प्रशिक्षणादरम्यान उंचीची वाटणारी भीती आता पुर्णपणे दुर झाल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. त्याच बरोबर या कार्यक्रमात सैनिकांच्या कुटुंबातील पाच मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचे संघवी ग्रुपकडून घोषित करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना सुश्मिता सेन म्हणाल्या, “संघवी पार्श्वने गेल्या इतक्या वर्षांत केलेल्या कार्यामुळे नव्हे; तर आजपासून सुरू केलेल्या नव्या वाटचालीमुळे संघवी पार्श्वने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना मला खरेच खूप आनंद वाटला. विशेषतः सीमा संघवी वेल्फेअर फाउंडेशनने हाती घेतलेल्या कामाचा मला अभिमान वाटतो. महाडिक यांच्या शौर्याला खरेच सलाम करायला हवा. त्यांनी दाखवलेले साहस अपवादात्मक व वैशिष्ट्यपूर्ण आहे. दोन मुलींचा आई म्हणून, त्यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणे माझ्यासाठी गौरवास्पद आहे असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एटीटी पार्सलच्या जंगलात खून: सुटकेसमध्ये अढळला मृतदेह

News Desk

आरोग्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा

News Desk

Parel Fire | चिमुरडीने वाचवले कुटुंबियांचे प्राण

News Desk