HW News Marathi
मुंबई

पोकळ धमक्यांसाठी शिवसेनेचं नाव गिनीज बुकात नोंदवा – नितेश राणे

मुंबई – महाराष्ट्र सरकारला दिलेलं समर्थन परत घेण्याच्या पोकळ धमक्या देणाऱ्या शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीनं शिवसेनेचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवावं, अशी मागणी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे एका चिठ्ठीद्वारे केली आहे. आमदार नितेश यांनी ती चिठ्ठी ट्विटरवर पोस्टही केलीय.

काँग्रेस नेते आणि आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे नाव नोंदवण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकारचं समर्थन परत घेणार असल्याच्या पोकळ धमक्या देणा-या शिवसेनेच्या नावे रेकॉर्ड नोंदवला गेला पाहिजे, असं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला चिठ्ठी लिहून नितेश राणेंनी कळवलं आहे.

नितेश राणे म्हणाले, मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीने एक रेकॉर्ड रजिस्टर करू इच्छितो, शिवसेनेनं ब-याचदा भाजपा सरकारचं समर्थन परत घेण्याच्या पोकळ धमक्या दिल्या आहेत. गिनीज बुकात नोंद होणारा हा अशा प्रकारचा पहिलाच विक्रम असेल. माझ्या या पत्रालाच नोंदणीसाठीचा अर्ज समजून विक्रम नोंदवावा, अशी विनंतीही नितेश राणेंनी पत्रामध्ये केली आहे. शिवसेनेसाठी हा एक वेगळा रेकॉर्ड असेल, अशी कोपरखळीही राणेंनी पत्रातून शिवसेनेला लगावली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मरण्यासाठीही आता ‘आधार’ हवे

News Desk

जीएसटीनंतर लवकरच नवा कायदा

News Desk

वाशिंद स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेले रोको!

News Desk