HW News Marathi
मुंबई

पोलीसावर बलात्काराचा गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार

मुंबई – नवऱ्याने केलेल्या दुसऱ्या लग्नाची तक्रार द्यायला पोलिस ठाण्यात आलेल्या एका विवाहित तरूणीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तुषार तिऊरवडे या पोलीस शिपायाने या तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून मारहाण करीत गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी, पोलीस कॉन्स्टेबल तुषार मारुती तिऊरवडे (वय ३२, रा. गोविंदजी केणी रोड, भोईवाडा पोलीस लाइन, भोईवाडा) याच्याविरुद्ध अखेर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिऊरवडे हा सशस्त्र दल (एल-१) नियुक्तीला असून, सहआयुक्त (प्रशासन) यांच्याकडे ‘आर्डर्ली’ म्हणून काम करीत असताना, त्याने विवाहित तरुणीशी जवळीक साधली होती.

याबाबत तरुणीने तक्रार करूनही वरिष्ठाकडून कारवाई होत नव्हती. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपविला. या शाखेतील महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाकडून सविस्तर चौकशी करण्यात आली. त्यानंतर, शनिवारी रात्री उशिरा तिऊरवडे विरुद्ध बलात्कार, भू्रणहत्या व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम ३७६, ३१५, गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याणमध्ये राहात असलेल्या या तरुणीच्या नवऱ्याने परस्पर दुसऱ्याशी विवाह केल्याने, त्याबाबत तक्रार देण्यासाठी आली असता, कॉन्स्टेबल तुषार तिऊरवडे तिच्या संपर्कात आला. पती घटस्फोट देणार असल्याने तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवित शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून गर्भवती झाल्यावर त्या तरूणीने लग्नाचा आग्रह धरल्यानंतर तो टाळाटाळ करू लागला. तिला मारहाण करून गर्भपात घडविला. पोलीस मित्र संतोष कदम याच्या सहकार्याने दमदाटी करीत, दोघांनी या प्रकरणाची कोठेही वाच्यता न करण्यास तिला धमकाविले. त्याचप्रमाणे, कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नावाचा वापर करून भोईवाडा पोलिसांकडून खोटी कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपविली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जीएसटीनंतर लवकरच नवा कायदा

News Desk

मुंबईमध्ये आगीचे तांडव

News Desk

मनपा शाळेच्या मैदानावरील अतिक्रमण हटविले

swarit