HW News Marathi
मुंबई

पहिले माझ्याशी तर निपटा; मुख्यंमत्र्यांचं सेनेला आव्हान

मुंबई – ‘मोदींच्या आधी फडणवीसशी तर निपटा’, असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत शिवसेनेला डिवचायला सुरूवात केली. यापुढेही भाजप आक्रमकपणे शिवसेनेवर टीका करेल असे स्पष्ट संकेतही यानिमित्ताने दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका-टिप्पणी करणाऱ्या शिवसेनेला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आव्हान दिले.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. गेल्या तीन दिवसांत त्यांनी तीन सभा घेतल्या. त्यात, भाजपवर हल्ला चढवतानाच त्यांनी केंद्रातील मोदी सरकारलाही लक्ष्य केलं. मुंबईत ‘मित्रोंss’ असा आवाज ऐकू आला तर त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. इथे मोदींची सभा झाली तरी विजय शिवसेनेचाच होईल, असे ठणकावत त्यांनी भाजपला डिवचले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी आज रोखठोक प्रत्युत्तर दिले.

शिवसेनेने एकप्रकारे पंतप्रधान मोदींना आव्हान दिले आहे, त्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता, मोदींच्या आधी फडणवीसशी तर निपटा, या एका वाक्यात त्यांनी उद्धव यांच्यावर बाण सोडला. त्यामुळे येत्या १५-२० दिवसांत सेना-भाजपमधील ‘राडा’ तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रकाश आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षतेचे धडे आम्हाला देऊ नयेत | पवार

Gauri Tilekar

चुनाभट्टीत मद्यधुंद कारचालकाच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

News Desk

१५ एप्रिलला रेल्वे सुरु होणार का? यावर रेल्वे प्रशासनाने दिले उत्तर

News Desk