HW News Marathi
मुंबई

मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहातील जेवणात भेसळ आढळल्यास अॅट्रोसीटी नुसार कारवाई करणार

 

मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्या प्रश्नावर सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांची माहिती

मुंबई वसतिगृहात राहणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जेवणात विषबाधा होणे असे प्रकार गेली अनेक वर्षे सतत घडत असून, अन्न धान्य भेसळ करण्यात येते हे प्रकार रोखण्यासाठी अशी घटना घडण्यास संबंधित कंत्राटदारावर यापुढे अॅट्रोसीटी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानसभेत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या प्रश्नावर केली.

चेंबूर येथील संत एकनाथ मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल सापडल्याची घटना २२ फेब्रुवारी २०१७ रोजी आढळून आली. त्यापूर्वी जेवणात काचेचे तुकडे, गोगलगाय आढळल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. तर राज्यातील विविध वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून अशा स्वरूपाच्या तक्रारी करण्यात येत असल्याकडे विधानसभेत लक्षवेधी सुचनेमार्फत लक्ष वेधण्यात आले होते. या चर्चेत सहभागी होताना आमदार आशिष शेलार यांनी याबाबत सरकारने कठोर उपयोजना करण्याची आवश्यकता आहे असे सांगत अशा प्रकारे कंत्राटदार दोषी आढळल्यास त्यांच्यावर अॅट्रोसीटी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल काय असा प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी ही सूचना मान्य करत यापुढे अशा घटनांवर अॅट्रोसीटी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे घोषित केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टाटा पॉवरच्या मदतीने राबवली ‘खिळेमुक्त झाडे’ मोहीम

News Desk

तळोजातील टायर गोदामाला भीषण आग

News Desk

छगन भुजबळांच्या प्रकृतीची विधानपरिषद सभागृहात चिंता योग्य उपचार करण्याची धनंजय मुंडे यांची मागणी

News Desk