HW News Marathi
मुंबई

मुंबई विमानतळावर सोने तस्करीचे रॅकेट उघडकीस

मुंबई – दुबईहून आणलेले सुमारे एक किलो ८६५ ग्रॉम सोने विमानतळ प्रशासनाच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने सोने तस्करीचे हे रॅकेट उघडकीस आले आहे.
अश्रफ अमु (२५) या केरळमधील प्रवाशानं दुबईहून विमानाने हे सोने मुंबईत आणले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाथरूमधील कचरापेटीत दोन बँगामध्ये टाकले. अश्रफच्या संशयास्पद हालचालींवर विमानतळावरील अधिकारी त्याच्या मागावर होते त्याने कचरापेटी उघडून बघितले असता त्याच्यात दोन बॅगा आढळून आले त्या बॅगामधुन १६ सोन्याची बिस्किटे सापडली. त्याची बाजार किंमत एकून ५६ लाख रूपये आहे.
संबंधित अधिका-याला बाथरूमधील परिसरात आकाश मगर (२५) हा कंत्राटी सफाई कामगार संशयीत रित्या फिरताना दिसला मगर याची ड्युटी त्या ठिकाणी नसताना तो तिथे फिरतांना आढळला . संबंधित अधिका-याला पाहाताच तो पळुन जाण्याचा प्रयत्न करत असतांना त्याला अधिका-याने ताब्यात घेऊन चौकशी केले असता त्यांने त्याचा वरिष्ठ सुमित दलाल याचे नाव सांगितले. अधिका-याने दलाल याला ताब्यात घेऊन विचारपूस केले असता सोन्याचे बिस्किटाच्या तस्करीत सामिल असल्याची कबुली दलाल यांनी दिली. हे दोघेही सिला सल्यूशन्स या हाऊस किपींग कंपनीचे कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली असून पोलिस अधिक तपास करत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन

News Desk

मोटरमनच्या ‘त्या’ कृत्याला रेल्वे प्रशासन जबाबदार

News Desk

सतीश शेट्टी खून प्रकरणाची श्वेतपत्रिका काढावी आरटीआय अ‍ॅक्टिव्हिस्ट फोरमची मागणी

News Desk