HW News Marathi
मुंबई

मराठवाड्यातील विकासात्मक योजनांची आढावा बैठक 3 मे रोजी नांदेडमध्ये

उत्तम बाबळे

नांदेड :- मराठवाडा विकासात्मक विविध कार्यक्रम विशेष मोहिम स्वरुपात राबविण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील विविध यंत्रणांकडून नियोजन तसेच आढावा घेण्यासाठी व्यापक दौरा सुरु केला असून जिल्हा निहाय बैठका ते घेत आहेत. त्याच अनुशंगाने डॉ. भापकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ३ मे २०१७ रोजी सकाळी १०:०० वा. ए. के. संभाजी मंगल कार्यालय पावडेवाडी नाका येथे नांदेड जिल्ह्याची बैठक होणार आहे.

होत असलेल्या बैठकीत मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अभियान, मनरेगा, वृक्षारोपण, स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, सात / बारा संगणकीकरण, ईपॉज मशीन व ईपीडीएमएस या विषयांच्या अनुषंगाने नियोजन व अंमलबजावणीचा आढावा घेण्यात येणार आहे. बैठकीत जिल्हा स्तरावरील विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, तसेच सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याकडून विविध उपक्रम, योजनांच्या कामांबाबत आढावा घेण्यात येणार आहे. संबंधितांना वेळेत उपस्थित रहावे, असे निर्देशही जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अतिवृष्टीमुळे परीक्षेला पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार

News Desk

मित्राला पाठवले मैत्रिणींचे नग्न फोटो

News Desk

मराठी उद्योजकांनो स्वत:च्या व्यवसायाचे मार्केटिंग करा- आशिष पेठे

News Desk