HW News Marathi
मुंबई

मसाज पार्लरमध्ये कुंटनखाना

पुणे: वेश्या व्यावसायासाठी प्रसिद्ध असलेल्या बुधवारी पेठेतील १२ कुंटणखाने पोलिसांनी सील केले आहेत. यातील दोन कुंटणखाने दोन वषार्साठी तर उर्वरीत कुंटणखाने एक वषार्साठी सील करण्यात आले आहेत. दरम्यान, हा व्यवसाय बंद झाल्यानंतर काही ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यावसाय चालत होता.

अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आठ कुंटणखाने बंद करण्यात आल्याने आतापर्यंत चालू वर्षात एकूण २० कुंटणखाने सील करण्यात आले आहेत. मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेल्या जयश्री ऊर्फ कल्याणी देशपांडे हिच्या पाषाण रस्त्यावरील पल्लवी अर्पाटमेंटमधील एक फ्लॅटही पोलिसांनी एक वषार्साठी सील केला आहे. या कुंटणखान्याव्यक्तिरिक्त शहरातील आणखी काही कुंटणखाने सील करण्याची कार्यवाही पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, कुंटणखाने बंद केल्यानंतर पुण्यात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. या प्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली. तसेच या मसाज पार्लरवरून थायलंडच्या पाच तरुणींची देखील सुटका केली आहे.

https://twitter.com/Mahabatmi1

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धारावी पुनर्विकास प्रकल्पात आता राज्य सरकारचा सहभाग

Gauri Tilekar

चौदा वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

News Desk

मुंबईत एनटीपीसीच्यावतीने नो टोबॅको मोहिमेला सुरूवात

News Desk