HW News Marathi
मुंबई

माज़ी नगरसेवक संतोष उरणकर व त्यांच्या सुविद्य पत्नी भारती उरणकर समर्थकांसह भाजपमध्ये

पनवेल नगरपरिषदेचे माज़ी नगरसेवक संतोष उरणकर व त्यांच्या सुविद्य पत्नी भारती उरणकर यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. पिंपरी चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना प्रवेश देण्यात आला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील,माज़ी उपनगराध्यक्ष नंदकुमार पटवर्धन,जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी,माजी नगरसेविका नीता माळी, युवा नेते संजय भोपी आदी उपस्थित होते संतोष उरणकर व भारती उरणकर हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत, त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. सर्वसामान्यांचा विकास हा दृष्टिकोन घेऊन भाजपाच्या माध्यमातून जनहिताची कामे केली जातात. ‘सबका साथ सबका विकास’ या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विविध योजना व विकासकामातून देशाची व राज्याची झपाट्याने प्रगती होत आहे. त्या लोकहित विचारसरणीवर प्रभावित होऊन उरणकर दाम्पत्याने भाजपमध्ये प्रवेश केला. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्वाचा मानला जात असून या प्रवेशामुळे विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पनवेल महापालिकेच्या आशिर्वादाने रहिवाशी त्रस्त

News Desk

पोलीस असल्याचे भासवून तीन विद्यार्थ्यांना लुटले

News Desk

सेंट झेवियर्समध्ये ‘आमोद’ची ‘पखरण’

News Desk