HW News Marathi
मुंबई

येरवडा कारागृहात कैद्याचा खून

पुणे: पुण्यातील येरवडा एका कैद्याचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने दुसºया कैद्याच्या डोक्यात दगड घालून खून केला.

सुखदेव मेघराज महापूर (४३) असे खून करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे. तसेच आरोपी दिनेश दबडे (३५) येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. हे दोघे कैदी किचनमध्ये काम करत असताना त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्याच दरम्यान आरोपी दिनेश दबडे याने सुखदेव महापूर याच्या पाठीमागून येऊन डोक्यात दगड घातला. यात सुखदेव जागीच ठार झाला. खून झालेला सुखदेव महापूर याला अपहरणाच्या गुन्ह्यात साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मागील सात महिन्यांपासून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याचबरोबर आरोपी आणि खून झालेले कैदी दोघेही एकाच बराकीमध्ये राहत होते. या घटनेमागील आधिक तपास सुरू असल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील कोस्टल रोडच्या खोदलेल्या खड्यात पडून मुलाचा मृत्यू

News Desk

इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची अफवा

News Desk

उद्धव ठाकरेंच्या हस्ते नॅशनल मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण

Gauri Tilekar