HW News Marathi
मुंबई

विज्ञानाच्या पुरस्कारासाठी ते उतरले रस्त्यांवर!

पुणे – ‘विज्ञानाच्या नावाखाली पुराणकथा शिकवू नका’, ‘सायन्स, नॉट सायलेन्स’, ‘पुणे, तुझा सायन्सवर भरोसा नाय काय’, ‘सायन्स फीड्स अस, लेटस् फीड सायन्स’ असे फलक घेऊन शेकडो वैज्ञानिक आणि विज्ञानप्रेमी बुधवारी पुण्याच्या रस्त्यावर उतरले होते. विविध मागण्यांसाठी ‘इंडिया मार्च फॉर सायन्स’ या शास्त्रज्ञांच्या गटातर्फे बुधवारी पुण्यात महात्मा गांधी पुतळ्यापासून डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रो. नरेश दधिच, डॉ. विनीता बाळ, डॉ. सत्यजित रथ, ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे हमीद दाभोलकर, कार्यकर्ते व नागरिक या वेळी उपस्थित होते.

दरम्यान, मुंबईतही अशाच मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच देशभरात अन्यही अनेक ठिकाणी या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मूलभूत विज्ञानाला प्रोत्साहन देण्याऐवजी छद्म विज्ञान म्हणजेच अवैज्ञानिक विचारसरणी प्रस्थापित करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून देशपातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत. याविरोधात मुंबईतील नामांकित विज्ञान संस्था आणि वैज्ञानिक यांच्यावतीने या निषेध मोर्चाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते.

विज्ञानाच्या पुरस्काराला महत्त्व द्या, अशा आशयाचे फलक हातात घेऊन ग्रॅण्टरोड येथील ऑगस्ट क्रांती मैदानापासून सुरु झालेला मूकमोर्चा भारतीय विद्या भवनाजवळ येऊन समाप्त झाला. विज्ञान संस्थांमध्ये सुरूअसलेल्या निधी कपातीला स्थगिती देऊन एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीन टक्के तरतूद ही विज्ञान आणि संशोधन क्षेत्रासाठी करण्यात यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शनिवार ठरला अपघातवार एक दिवस.. 7 अपघात.. 30 ठार..

Adil

प्रकाश मेहता यांनी राजीनमा द्यावा-मलिक

News Desk

चालत्या लोकल मध्ये ‘किकी चॅलेंज’, तरुणाचा शोध सुरू

swarit