भाजपाच्या राजकीय हस्तक्षेपामुळे संघटनेतील मतभेद चव्हाट्यावर
मुंबई
विधानपरिषदेत आत्तापर्यंत शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कायम झगडत राहणा-या आणि २१ आमदार विधानपरिषदेत पाठविणा-या महाराष्ट शिक्षक परिषदेला भाजपाने शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत हायजॅक केले आहे. आत्तापर्यंत भाजपाचा कोणताही थेट हस्तक्षेप नसलेल्या या परिषदेचे निवडणुकीतील सर्व कामकाज परिषदेच्या कार्यकर्त्याना डावलून थेट भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार पाहत असल्याने परिषदेच्या अनेक जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून यामुळे परिषदेतील मतभेदही चव्हाट्यावर आल्याने याचा जबर फटका नागपूर, कोकण शिक्षक मतदार संघात परिषदेला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात सुरू असलेल्या शिक्षक परिषदेच्या निवडणुकीत नागपूर शिक्षक मतदार परिषदेकडून विद्यमान आमदार नागो गाणार यांना ऐनवेळी दुस-यांदा उमेदवारी देण्यात आली आहे तर औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून सतीश पत्की तर कोकण मतदार संघातून परिषदेचे अध्यक्ष असलेले वेणूनाथ कडून यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कडू यांच्या उमेदवारीला निवडणुकांपूर्वी कोकणातून रायगड जिल्ह्यातील काही पदाधिका-यांचा अपवाद सोडला तर सर्वच ठिकाणच्या परिषदेच्या पदाधिकाºयांनी विरोध दर्शवून विद्यमान रामनाथ मोते यांनाच उमेदवारी देण्याची मागणी करणारे ठराव केले होते. मात्र या ठरावाकडे परिषदेतील काही प्रांतांच्या मंडळींनी दुर्लक्ष करत भाजपाच्या सांगण्यावरून ऐनवेळी मोते यांना डावलले गेले. तर शिक्षकांसाठी खास चेहरा नसलेल्या वेणूनाथ कडू यांना उमेदवारी दिल्याने असून त्यामुळे परिषदेत ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आदी जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. परिषदेच्या इतर उमेदवारांना तीन-तीन वेळा संधी दिली, आता मोेतेंना यावेळी ती का दिली नाही, असा सवालही केला जात आहे.
परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आत्तापर्यंत शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढवली जात असताना यावेळी भाजपाने कोकण, औरंगाबाद आणि नागपूर मतदार संघातील सर्व प्रचार यंत्रणा हाती घेतली असून कोकणात दोन मंत्री तीन खासदार आणि तब्बल १५ हून अधिक भाजपाचे आमदार शिक्षकांना भुलविण्यासाठी धावपळ करत आहेत. तर अनेक आरोप असलेल्या ठाण्यातील एका मंत्र्यांकडून तर शिक्षकांना दम देण्याचे प्रकारही समोर आले आहेत. यामुळे असंख्य शिक्षक दबावाखाली असल्याचेही बोलले जात आहे. नागपुरात गाणार यांच्या विरोधात संघाच्या समरसता मंचचे विदर्भ प्रमुख आणि परिषदेचेच कार्यकर्ते असलेले संजय बोंद्रे उभे असल्याने याचा धसका भाजपाने घेतला आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी गाणार यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सभा घेतली तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही हेही लवकरच यासाठी प्रचाराला येणार असल्याचे सांगण्यात येते. तर परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये नागपूर, कोकणात मोठी फूट पडली असल्याचे बंडखोर उमेदवार संजय बोंद्रे यांनीही सांगितले.
महाराष्ट राज्य शिक्षक परिषद ही संस्था मागील अनेक कोणत्याही राजकीय पक्षाशी थेट बांधिलकी नसलेली संस्था म्हणून ओळख आहे. मात्र ही ओळख राज्यात सध्या सुरू असलेल्या विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत पुसली गेली असून संपूर्ण संघटनेचे कार्यक्रम आणि प्रचारांसाठी लाखो रुपयांचा चुराडा सत्ताधारी भाजपाकडून केला जात असल्याने परिषदेचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत.आहे. तर सरकारवर शिक्षक आणि संस्थाचालकांचा मोठा रोष असतानाच भाजपाचा प्रचार परिषदेसाठी अडचणीचा ठरेल असेही बोंद्रे म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.