HW News Marathi
मुंबई

शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते – शरद पवार  

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज हे गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. या विधानासाठी त्यांनी प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ त्र्यंबक शेजवलकर यांचा दाखला दिला.

श्रीमंत कोकाटे लिखित सचित्र शिवचरित्राचं प्रकाशन झालं आज पुणे इथल्या बालगंधर्व रंगमंदिरात झालं. त्यावेळी पवार बोलत होते. महाराज जर मुस्लिमविरोधी असते, तर त्यांनी कृष्णाजी कुलकर्णीला शिक्षा दिली नसती. त्यावरुन महाराज हे रयतेचे होते, ते सर्वांचे होते, असं शरद पवारांनी नमूद केलं. शिवाजी महाराज गोब्राम्हण प्रतिपालक होते हे म्हणणं अऐतिहासिक होतं असं शेजवलकरांनीही सांगितलं आहे, असं पवार म्हणाले.

शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा मुस्लिम म्हणून नाही, तर शत्रू म्हणून काढल्याचं पवार म्हणाले. “छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या धर्मांचे होते. सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. त्यांच्या नौदलाचा प्रमुख,अंगरक्षक मुस्लिम होता. अफझलखान त्यांच्यावर चाल करून आला तेव्हा त्याचा कोथळा काढला कारण तो स्वराज्याचा शत्रू होता ना की मुस्लिम होता म्हणून. अफझल खानाचा वकील होता – कृष्णाजी कुलकर्णी याचाही खात्मा तिथेच केला कारण तोही स्वराज्याचा शत्रू होता”, असं पवार म्हणाले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुर्ला-टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे

News Desk

मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर १४ ऑगस्टला सुनावणी

swarit

मुंबईतून 50 उड्डाणे रद्द

News Desk