HW News Marathi
मुंबई

संघर्ष यात्रा भाजपचं पेटंट आहे का ? – धनंजय मुंडे

  • निवडणुका जिंकल्या म्हणून सत्तेची मस्ती का ? – धनंजय मुंडे

मुंबई – संघर्ष यात्रा म्हणजे काय भाजपाचे पेटंट आहे का? आम्ही यात्रा काढली म्हणून पोटदुखी का? सरकार संघर्ष यात्रेची नाही, शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे. भाजपच्या संघर्ष यात्रा किती टनाच्या वातानुकुलित (एसी) गाडीत आणि कोणत्या पंचतारांकित हॉटेलात थांबायच्या हे सांगू का? 30 हजार कोटी कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आणखी किती आत्महत्येची सरकार वाट पाहात आहे?” असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला विचारला आहे.

उत्तर प्रदेशात भाजपप्रणित योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने एक लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली आहे. याच मागणीवरून गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांकडून सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करण्यात येत आहे. मात्र, अद्याप सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विरोधी पक्षांनी कर्जमाफीसाठी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्ष यात्रा काढली होती. या संघर्षयात्रेचा मंगळवारी समारोप झाला.

विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात राज्यात 100 शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या झाल्या. सरकारला लाज वाटत नाही का? निवडणुका जिंकल्या म्हणून सत्तेची इतकी मस्ती आली आहे का?, असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला विचारला.

आज (बुधवार) विधानपरिषदेत बोलताना मुंडे यांनी कर्जमाफीवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंडे म्हणाले, ”महाराष्ट्रातही भाजपचेच सरकार आहे. मग एकाच पक्षाची दोन राज्यात वेगवेगळी विचारधारा कशी असू शकते? महाराष्ट्रातल्या भाजपला काय झालंय? असा प्रश्नही मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्सवाच्या काळात ‘परे’ची कारवाई

News Desk

पोलिस अधिका-याची दादागिरी सीसीटिव्हीत कैद

News Desk

कल्याणमध्ये विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू

Gauri Tilekar