HW News Marathi
मुंबई

सपा उमेदवारांनाच निवडून द्या अबू आझमी यांचे आवाहन

मुंबई – बेहरामबाग येथे झालेल्या भोजपुरी संगीताच्या कार्यक्रमात स्थानिकांनी समाजवादी पार्टीच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समाजवादी पार्टीचे अामदार अबू आझमी यांनी जोगेश्वरी वॉर्ड क्रमांक ६१च्या उमेदवार गायत्रीदेवी आणि वॉर्ड क्रमांक ६२चे उमेदवार फव्वाज मेनन यांना निवडून देण्याचे आवाहन या वेळी केले.

वॉर्ड क्रमांक ६२चे उमेदवार फवाज मेनेन हे कर्तव्यनिष्ठ तसेच लोकप्रिय आहेत.

जनतेने या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून एक प्रकारे त्यांच्या समर्थनच दाखवले आहे, असे म्हणून याबद्दल आझमी यांनी जनतेचे आभार मानले. फवाज मेनन नेहमीच सुखदुःखात सोबत असतील असा या वॉर्डातील रहिवाशांना विश्वास आहे. या वॉर्डातील रहिवासी कचरा, गटार आणि पाणी या समस्यांनी त्रस्त आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर या समस्या तात्काळ सोडवून जनतेला पूर्णपणे साह्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उल्हानगरमध्ये भोंदू बाबांना संतप्त नागरिकांनी झोडपले; चारही भोंदू पोलिसांच्या ताब्यात

News Desk

भायखळा परिसरातील स्टेशनरी दुकानात आग

swarit

कॉंग्रेसने उंदीर सोडले की काय | रामदास आठवले

News Desk