HW Marathi
मुंबई

धारावीतील निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळून १ मृत्यू, ३ जण जखमी

मुंबई | धारावीतील पीएमजीपी कॉलनीमधील निर्माणाधीन इमारतीचा काही भाग कोसळली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आहे. ही घटना रविवारी (१४ एप्रिल) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला.

कंत्राटदराच्या हलगर्जीपणामुळे या इमारतीचा भाग कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकलवरून जाणारी एक व्यक्तीही या अपघातात जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन बचावकार्य केले. या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.

 

Related posts

कॉंग्रेसने उंदीर सोडले की काय | रामदास आठवले

News Desk

माझगावमधील जीएसटी भवनमध्ये अग्नितांडव, अग्निशमनदल घटनास्थळी दाखल

अपर्णा गोतपागर

आरोग्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा

News Desk