HW News Marathi
मुंबई

मरेच्या गणेशोत्सवासाठी १३२ विशेष गाड्या, ३० जुन पासून आरक्षण सुरु

मुंबई | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी पाहता कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनाने १३२ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, एलटीटी, दादर पुणे स्थानकातून, सावंतवाडी, रत्नागिरी आणि पेरनम या स्थानकांसाठी या स्पेशल गाड्या चालविण्यात येणार आहेत. ३० जून पासून प्रवासी, चाकरमानी या स्पेशल ट्रेनचे आरक्षण करु शकणार आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना आरक्षित तिकिट मिळण्यास मदत होणार आहे.

कश्या असतील रेल्वेच्या फेऱ्या

मुंबई ते सावंतवाडी स्पेशल ट्रेनच्या ४४ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ही स्पेशल ट्रेन ५ ते ३० सप्टेंबर दरम्यान आठवड्यातील सहा दिवस (गुरुवार वगळता) धावणार आहे. ०१००१ मुंबई ते सावंतवाडी स्पेशल ट्रेन दररोज रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटणार असुन सावंतवाडीला दुपारी २ वाजून १०मिनिटांनी पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ०१००२ सावंतवाडी ते मुंबई स्पेशल ट्रेन त्याच दिवशी दुपारी ३ वाजता सुटणार असून मुंबईला पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी पोहचणार आहे. मुंबई ते सांवतवाडी स्पेशल ट्रेनच्या ८ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ०१००७ मुंबई ते सांवतवाडी स्पेशल ट्रेन ६ ते २७ सप्टेंबर दरम्यान दर गुरुवारी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटणार असून सावंतवाडीला दुपारी २ वाजून १० मिनिटांनी पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ०१००८ सावंतवाडी ते मुंबई स्पेशल ट्रेन गुरुवारी दुपारी ३ वाजता सुटणार असून मुंबईला पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी पोहचणार आहे.या ट्रेनला दादर, ठाणे पनवेल,रोहा,माणगाव,वीर,खेड,चिपळुण,सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड,रत्नागिरी,अडवली,वलिवडे,राजापुर रोड,वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झराप या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

मुंबई-रत्नागिरी-पनवेल स्पेशल ट्रेनच्या २२ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ५ ते १५ सप्टेंबर दरम्यान दररोज या फेऱ्या धावणार आहेत.०१०३३ सीएसएमटी – रत्नागिरी ट्रेन सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून त्याच दिवशी रात्री १० वाजता पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ०१०३४ रत्नागिरी -पनवेल ट्रेन रात्री १० वाजून ५० मिनिटांनी सुटुन पनवेलला दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी पोहचणार आहे. पनवेल-सावंतवाडी-मुंबई स्पेशल ट्रेनच्या २२ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ७ ते १७ सप्टेंबर दरम्यान दररोज या फेऱ्या होणार आहेत. ०१०३५ पनवेल-सावंतवाडी ट्रेन सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटणार असुन त्याच दिवाशी रात्री १० वाजता पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ०१०३६ सावंतवाडी -मुंबई ट्रेन रात्री ११ वाजता सुटणार असुन सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी पोचणार आहे.या सर्व गाड्यांना एसी थ्री टायरचे २ कोच, स्लीपर क्लासचे १० कोच, जनरल सेकण्ड क्लासचे ६ कोच असणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस-रत्नागिरी दरम्यान एसी डबल डेकर गाडीच्या ६ फेऱ्या होणार आहेत. ४ ते १८ सप्टेंबर दरम्यान दर मंगळवारी ही ट्रेन धावणार आहे.०११८७ एलटीटी-रत्नागिरी एसी डबल डेकर ट्रेन पहाटे ५ वाजून ३३ मिनिटांनी सुटून रत्नागिरीला दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी पोहचणार आहे. तर ०११८८ रत्नागिरी-एलटीटी एसी डबल डेकर ट्रेन दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी सुटून एलटीटीला रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी पोहचणार आहे. या गाडीला ठाणे,पनवेल,रोहा,माणगाव,वीर,ख्रेड,चिपळुण,सावर्डे,अरवली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. या गाडीला एसी चेअर कारचे ६ कोच असणार आहेत.याशिवाय एलटीटी-पेरनम ,एलटीटी-झराप ट्रेनच्या प्रत्येकी ८ फेऱ्या,पुणे-सावंतवाडी २ फेऱ्या ,पनवेल-सावंतवाडीच्या ४ फेऱ्या आणि पनवेल-रत्नागिरी-पुणे ट्रेनच्या ४ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भेंडी बाजारात आग

News Desk

पालघर जिल्ह्यातील डहाणूत भूकंपाचे जोरदार धक्के

News Desk

एलबीएस मार्गाच्या रुंदीकरणात १७०० दुकानदार रस्त्यावर

Gauri Tilekar