HW News Marathi
मुंबई

भाजपाला पुण्यात खिंडार

योगेश ससाणे, सविता मोरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे: हडपसर, – हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजप व मनसेला मोठे खिंडार पडले असून योगेश ससाणे व सविता मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी अजित पवार यांनी सत्कार करून व उपरने घालून विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश केला

निसर्ग मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, सुरेश घुले, राजलक्ष्मी भोसले नगरसेवक चेतन तुपे, मंगेश तुपे, विजय मोरे, प्रवीण तुपे, निलेश मगर, सुनील बनकर, दत्ता तुपे, प्रशांत पवार, अतुल तरवडे, हनुमंत तुपे, प्रतिमा तुपे, मयूर तुपे, विक्रम जाधव, विजय तुपे, भानुदास शिंदे, योगेश जगताप आदी उपस्थित होते.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी नगरसेवक दत्तात्रय ससाणे, हडपसर विभाग कोषाध्यक्ष योगेश ससाणे, मनसे हडपसर उपाध्यक्ष सविता मोरे, उपाध्यक्ष अमोल मारणे, सचिन मोरे, राजेश पवार, उबेद खान, इम्रान खान, वसंतराव फाऊंडेशन चे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, रिजवान शेख, प्रताप उबाळे, संकेत खेडेकर, सोमनाथ मोरे, राजेश देव, यांच्यासह राजू हिंगणे व असंख्य कार्यकर्त्यांनी नगरसेवक चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला.

दरम्यान, राज्यात होणाऱ्या महापालिकांच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्व पक्षांच्या रणधुमाळीला सर्वत्र सुरवात झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे योगेश ससाणे व सविता मोरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजप आणि मनसेला मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाण्याच्या बिलासाठी पालिका मोजणार ३ कोटी ५५ लाख रुपये

swarit

जखमी गोविंदांची सांस्कृतिक मंत्र्यांनी घेतली भेट

swarit

मनसेला जशाच तसे उत्तर दिले, संजय निरुपमवर गुन्हा

News Desk