HW News Marathi
मुंबई

#26/11Attack : कसाबच्या कुकर्माची दशकपुर्ती

मुंबई | मुंबईवर झालेला २६ नोव्हेंबर २००८ रोजीचा दहशतवादी हल्ला म्हणजे केवळ दहशतवादी हल्ला नव्हे तर संपूर्ण देशावर झालेलं दहशतवाद्यांचं युद्ध असे म्हणता येईल. हा हल्ला प्रचंड भीषण होता त्याच बरोबर मुंबईच्या विविध ठिकाणी रचनात्मक दृष्ट्या पुर्वनियोजन करुन करण्यात आलेला हा हल्ला मोठ्या प्रमाणात दिशात्मक कारणांमुळे गाजला. आज या हल्ल्याला १० वर्षे पुर्ण होत आहेत परंतु रोज कामाच्या घाईत धावणा-या प्रत्येक मुंबईकराला हा हल्ला अगदीच काल झाला असल्यासारख वाटत.

हा हल्ला मोठ्या प्रमाणात गाजण्यामागची ठळक वैशिष्ट्य म्हणजे दहशतवाद्यांनी २६/११ ही जी तारीख निवडली ही तारीख म्हणजे भारतीय लोकशाहीच्या संविधानाचा संविधान दिवस आहे. म्हणजेच त्या दिवशी भारताने लोकशाही प्रजासत्ताक राज्य प्रस्तापित करुन ते अंगीकृत केलेले आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर या हल्ल्याचा विचार केला तर या हल्ल्याचा मुख्य हेतू म्हणजे भारतीय संविधानावर हल्ला असाच होतो. २६ नोव्हेंबर च्या या हल्ल्याचे दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ दहशतवादी हल्ला नव्हता. कारण, दहशतवादी हल्ल्यामध्ये विशिष्ट धर्मसमुदाय, विशिष्ट् पक्ष यांना लक्ष केले जाते. परंतु, या दशहतवादी हल्ल्याचे नियोजन देशाच्या सीमेबाहेर पाकिस्तानमध्ये झाले आणि या प्लॅनिंगमध्ये अमेरीकन गुप्तवार्ता एजन्सी सुद्धा तितक्याच सामिल होत्या.

हेडली राणा जो हा हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार होता. ज्याने या हल्ल्यापुर्वी पंचतारांकीत हॉटेल्स आणि इतर भारताच्या प्रदेशामध्ये प्रवास करुन त्याने हल्ल्याची रेखी केली तो अमेरीकेच्या जेलमध्ये क्रीमिनल प्री बार्गेंनचा फायदा घेऊन आराम करत आहे. तीसरे आणि महत्वाचे कारण म्हणजे हा हल्ला जेव्हा झाला तेव्हा भारतीय गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या. या हल्ल्यानंतर भारतात काय काय स्थित्यांतरे झाली हा ही तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. भारताने असा हल्ला होऊ नये म्हणून काही युद्ध सामुग्री विकत घेतल्या आणि त्यामुळे भारताचे बजेट किती गेले ज्या देशांनी त्या विकल्या त्या देशांचे अर्थकारण त्यावर चालते त्या देशांच फावल कारण हा दहशतवादी हल्ला हा दहशतवादी हल्ला किंवा युद्ध नसून एक व्यापारी तंत्र होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

आपण आजही सुरक्षित आहोत का ?

या दहशतवादी हल्ल्यांची मालिका पाहिली तर लक्षात येते जेव्हा १९९२-९३ चे बॉंंम्ब स्फोट झाले, त्यानंतर रेल्वेमध्ये बॉम्ब स्फोट झाले. त्यानंतर मालेगावमध्ये बॉम्ब स्फोट झाले , समझोता एक्स्प्रेस मध्ये बॉंम्ब स्फोट झाले या सर्व प्रकरणांमध्ये हल्ल्याचे स्वरुप बदललेल आपल्याला पहायला मिळते. आज आम्हाला हे प्रेडीक्टच करता येत नाही की पुढचा येणारा हल्ला हा बोयोटेरारीझम असेल, केमिकल टेरारीझम असेल, न्यूक्लिअर टेरारीझम असेल की कुठल्या प्रकारचा दहशतवादी हल्ला असेल . भारतीय सुरक्षा यंत्रणा जर राजकारणाच्या बाहुल्याने काम करत असतील तर या लोकशाही देशात जनता कधीही सुरक्षित राहू शकत नाही. भारताचे संविधान जर टिकवायचे असेल तर प्रत्येकाने जागरुक व्हायला पाहीजे सतर्क राहीले पाहीजे. तसेच जागतिक स्तरावर काय घडामोडी घडत आहेत ते लक्षात घेऊन आपली सुरक्षा यंत्रणा सज्ज केली पाहिजे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महापालिकेचा ३० हजार ६९२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

News Desk

कर्नाटकातील राजकीय परिस्थितीवर येडियुरप्पा म्हणतात “वेट अँड वॉच”

News Desk

शिवस्मारकाची रचना बदलणार ?

News Desk